Smriti Irani on Rahul Gandhi: 'भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी...,' राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यावर स्मृती इराणींचा हल्लाबोल

Smriti Irani Statement: भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
Smriti Irani
Smriti IraniDainik Gomantak
Published on
Updated on

Smriti Irani on Rahul Gandhi Us Tour: भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी राहुल गांधी यांच्या सुनीता विश्वनाथ यांच्या अमेरिकेतील कथित भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुनीता विश्वनाथ या अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्या मालकीच्या संस्थेच्या सदस्य आहेत, ज्यावर भारतविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.

स्मृती इराणी यांनी विचारले की, 'राहुल गांधी जॉर्ज सोरोसबरोबर का संबंध ठेवत आहेत. सोरोस काय करु इच्छितात हे सर्वांना माहीत आहे.' आरोप करताना इराणी यांनी एक फोटोही दाखवला, ज्यामध्ये राहुल गांधी विश्वनाथ यांच्यासोबत बसलेले दिसत आहेत.

Smriti Irani
Smriti Irani: '...असे राजकीय पक्ष दहशतवाद्यांच्या पाठीशी', केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी का दिली अशी प्रतिक्रिया

स्मृती इराणी यांनी हा दावा केला

स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी असाही दावा केला की, 'राहुल गांधींच्या न्यूयॉर्क भेटीचे संयोजन इस्लामिक सर्कल ऑफ नॉर्थ अमेरिका (ICNA) चे प्रकल्प संचालक तंजीम अन्सारी यांनी केले होते, ज्यांचे जमात-ए-इस्लाम – दोन्ही कट्टर इस्लामिक संघटनांशी संबंध आहेत.'

त्या पुढे म्हणाल्या की, 'जॉर्ज सोरोस काय करु इच्छितात हे प्रत्येक भारतीयाला स्पष्ट असताना, राहुल गांधी ज्यांना सोरोसने आर्थिक मदत केली आहे. हे देखील स्पष्ट आहे की, हे एकमात्र सोरोस कनेक्शन नाही.'

इराणी पुढे म्हणाल्या की, 'कर्नाटकातील भारत जोडो यात्रेतही जॉर्ज सोरोसद्वारा पोषित ओपन सोसायटी फाऊंडेशनचे जागतिक उपाध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत दिसले होते.'

Smriti Irani
Rahul Gandhi: राहुल गांधींना झटका, केरळ राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

दुसरीकडे, वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी 31 मे पासून 10 दिवसांच्या यूएस दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान त्यांनी सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्क या तीन शहरांमध्ये कार्यक्रमांना हजेरी लावली. भारत जोडो यात्रेच्या संदर्भात, जॉर्ज सोरोस-अनुदानित ओपन सोसायटी फाउंडेशनचे जागतिक उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत दिसल्याबद्दल इराणी यांनी काँग्रेसवर टीका केली.

Smriti Irani
Rahul Gandhi: 'मुस्लिम लीग सेक्युलर पार्टी...,' राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल

जॉर्ज सोरोस कोण आहेत?

तसेच, 92 वर्षीय अमेरिकन-हंगेरियन जॉर्ज सोरोस एक अब्जाधीश गुंतवणूकदार, परोपकारी, शॉर्ट-सेलर आणि राजकीय कार्यकर्ते आहेत. US$8.5 बिलियनच्या निव्वळ संपत्तीसह, सोरोस हे ओपन सोसायटी फाउंडेशनच्या स्थापनेसाठी प्रसिद्ध आहेत, ही संस्था लोकशाही, पारदर्शकता आणि भाषण स्वातंत्र्याच्या पुढाकारांना समर्थन देण्यासाठी अनुदान प्रदान करते.

1930 मध्ये हंगेरीमध्ये जन्मलेले सोरोस हे एका श्रीमंत ज्यू कुटुंबातील असून ते आघाडीच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांपैकी एक मानले जातात. त्यावेळी प्रचलित असलेल्या सेमिटिझमला प्रतिसाद म्हणून, त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या ज्यू ओळखीचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे आडनाव श्वार्ट्झवरुन बदलून सोरोस केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com