Asia Cup trophy controversy Dainik Gomantak
देश

Ind vs Pak: "खेळात राजकारण येता नये" आशिया कप ट्रॉफीच्या वादावर एबी डिव्हिलियर्सचं स्पष्टीकरण, पाकड्यांची बाजू घेत म्हणाला...

Asia Cup trophy controversy: इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विजेत्या संघाला ट्रॉफीशिवाय आनंद साजरा करावा लागला आहे.

Sameer Amunekar

इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विजेत्या संघाला ट्रॉफीशिवाय आनंद साजरा करावा लागला आहे. आशिया कप २०२५ स्पर्धा जिंकूनही भारतीय संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. काही अटींवरून निर्माण झालेल्या या तणावामुळे नक्वी यांनी ट्रॉफी स्वतःजवळ ठेवली.

या घटनेला आता चार दिवस उलटून गेले असले तरी ट्रॉफीचा वाद अजूनही सुरूच आहे. नक्वी यांनी भारतीय संघाने स्टेजवर येण्यास नकार दिल्यानंतर, ट्रॉफी घेऊन कार्यक्रमातून बाहेर पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यामुळे चाहत्यांपासून ते माजी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनी या प्रसंगाबद्दल तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर या प्रकरणावर भाष्य केले आहे. डिव्हिलियर्स म्हणाले, "खेळांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. जे घडलं ते पाहून वाईट वाटले. अशा प्रकारच्या गोष्टींना खेळात काही स्थान नाही. आशा आहे भविष्यात अशा प्रसंगांची पुनरावृत्ती होणार नाही."

मोहसिन नक्वी यांचा ठाम पवित्रा
३० सप्टेंबर रोजी झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या मुद्द्यावर चर्चा झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नक्वी यांनी या प्रसंगाबद्दल खेद व्यक्त केला परंतु ट्रॉफी परत देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी वैयक्तिकरीत्या एसीसी कार्यालयात जाऊन ट्रॉफी स्वीकारावी, अशी मागणी केली.

परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या अटीला ठाम विरोध दर्शवत आहे. त्यामुळे ट्रॉफी वाद आणखी गडद झाला असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातही या घटनेवर चर्चेला उधाण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT