Goa Crime: हडफडेत पूर्ववैमनस्यातून मारवाडी तरुणास मारहाण, सात जणांनी केला हल्ला; पोलिस तक्रार नोंद

Goa Crime News: नागवा-हडफडे पंचायत क्षेत्रातील रावतावाडा प्रभागात अज्ञाताकडून अशोक बिश्नोई (३५, राजस्थान) या राजस्थानी तरुणास जबर मारहाण.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कळंगुट: नागवा-हडफडे पंचायत क्षेत्रातील रावतावाडा प्रभागात अज्ञाताकडून अशोक बिश्नोई (३५, राजस्थान) या राजस्थानी तरुणास जबर मारहाण करण्यात आली असून याबाबतीत हणजूण पोलिसांत रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक सूरज गावस पोलिस पुढील तपास करीत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करण्यात आलेला अशोक बिश्नोई हा राजस्थानी तरुण गॅस सिलिंडर टेक्निशियन म्हणून काम पाहत होता.

Goa Crime News
Goa Police Recruitment: 'पोलिस भरती' प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय वैधच! उच्च न्यायालयानं उमेदवारांची याचिका फेटाळली

मंगळवारी रात्री उशिरा बिश्नोई राहत असलेल्या नागवा-हडफडे येथील त्याच्या भाडोत्री रुमवर एकूण सात तरुणांनी पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याची तक्रार हणजूण पोलिसांत दाखल केली आहे.

यात सात हल्लेखोर सहभागी होते. पैकी तीन स्थानिक असल्याचा दावा अशोक बिश्नोई याने प्रसारमाध्यमांकडे केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com