T20 World Cup 2026 Dainik Gomantak
देश

T20 World Cup 2026: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, टी-20 वर्ल्डकपचे शेड्यूल लवकरच होणार जाहीर, आयसीसी मुंबईत करणार मोठी घोषणा

T20 World Cup 2026 Schedule: यंदाच्या टी-20 विश्वचषकासाठी आयसीसीकडून जोरदार तयारी सुरु असून मागील स्पर्धेप्रमाणेच यावेळीही एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या सर्व संघांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Manish Jadhav

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट जगतातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चे आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या स्पर्धेच्या वेळापत्रक आणि ग्रुप्सच्या घोषणेकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

यंदाच्या टी-20 विश्वचषकासाठी आयसीसीकडून जोरदार तयारी सुरु असून मागील स्पर्धेप्रमाणेच यावेळीही एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या सर्व संघांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे कोणत्या संघाला कोणत्या ग्रुपमध्ये स्थान मिळते, यावर आता चर्चा सुरु झाली आहे. विशेषतः भारत (India) आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच ग्रुपमध्ये असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

25 नोव्हेंबरला ग्रुप्सची घोषणा?

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 संदर्भात 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत एका विशेष कार्यक्रमात ग्रुप्स आणि संपूर्ण वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने

चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे, भारत आणि पाकिस्तानच्या (Pakistan) संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे. या ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तानसह उर्वरित तीन संघांमध्ये यूएसए, नेदरलँड्स आणि नामिबिया यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना कोलंबो येथील स्टेडियमवर खेळला जाण्याची शक्यता आहे. डिफेन्डिंग चॅम्पियन असलेला भारतीय संघ या स्पर्धेतील आपला पहिला सामना यूएसए संघासोबत खेळू शकतो.

श्रीलंकेचा ग्रुप 'ग्रुप ऑफ डेथ'

यजमान श्रीलंका संघाचा ग्रुप मात्र थोडा कठीण आणि आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. या ग्रुपला 'ग्रुप ऑफ डेथ' असेही म्हटले जात आहे. श्रीलंकेसोबत या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि ओमान या संघांचा समावेश असू शकतो.

इतर ग्रुप्सची संभाव्य रचना

या स्पर्धेत 5-5 संघांचे एकूण चार ग्रुप्स तयार केले जाणार आहेत. इतर दोन ग्रुप्सची संभाव्य रचना खालीलप्रमाणे असू शकते. या ग्रुपमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिजला एकत्र ठेवले जाऊ शकते. त्यांच्यासोबत बांगलादेश, नेपाळ आणि इटली हे संघ असण्याची शक्यता आहे. चौथ्या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसारखे मजबूत संघ असतील. त्यांच्यासोबत अफगाणिस्तान, यूएई आणि कॅनडा हे संघ खेळू शकतात.

सामने कुठे खेळवले जाणार?

या टी-20 विश्वचषकातील सामने भारत आणि श्रीलंका या दोन देशांतील मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि अहमदाबाद कोलंबो आणि कँडी या प्रमुख शहरांमधील मैदानांवर खेळवले जातील.

स्पर्धेचे स्वरुप (सुपर-8 स्टेज)

टी-20 विश्वचषक 2026 मध्ये प्रत्येक ग्रुपमधून टॉप-2 संघ सुपर-8 स्टेजसाठी पात्र ठरतील. यानंतर सुपर-8 मधील टॉप-4 संघ उपांत्य फेरी आणि त्यातून अंतिम फेरीत प्रवेश करतील. चाहत्यांसाठी 25 नोव्हेंबरची घोषणा रोमांचक आणि उत्सुकतेची ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier Novena: गोंयच्या सायबाचा नोव्हेना होणार सुरु! जुन्या गोव्यात भाविकांची मांदियाळी; वाचा सविस्तर माहिती

Goa Politics: "पक्षांतरबंदी हेच माझं उत्तर..." असं का म्हणाले विजय सरदेसाई? 2027 पर्यंत काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचं केलं स्पष्ट

VIDEO: मिचेल स्टार्कचा 'वन हँड' चमत्कार! स्वतःच्या गोलंदाजीवर डाईव्ह मारुन पकडला अविश्वसनीय झेल; पाहून तुम्हीही व्हाल थक्क

'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

Assonora Accident: दारूच्या नशेत चालवली गाडी, थेट कोसळली कालव्यात; मित्राचा बुडून मृत्यू, संशयिताचा जामीन नाकारला

SCROLL FOR NEXT