World Cup 2026: क्रिकेट वर्ल्ड कप शेड्यूल जाहीर, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; चाहत्यांची वाढवली उत्सुकता

ICC U19 World Cup 2026 Schedule: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढील वर्षी होणाऱ्या अंडर-19 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले.
india vs pakistan
india vs pakistanDainik Gomantak
Published on
Updated on

ICC U19 World Cup 2026 Schedule: क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढील वर्षी होणाऱ्या अंडर-19 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धेची क्रिकेटप्रेमींना, विशेषतः भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याची, खूप उत्सुकता होती. आयसीसीने अंडर-19 विश्वचषकासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला, ज्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघांना लीग टप्प्यात वेगळ्या गटांमध्ये ठेवण्यात आले. मात्र, स्पर्धेची रचना अशी करण्यात आली की, पुढील 'सुपर सिक्स' फेरीत या दोन्ही संघांमध्ये मोठी टक्कर होण्याची शक्यता कायम आहे.

यजमान देश आणि स्वरुप

पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होणारा हा विश्वचषक नामिबिया आणि झिम्बाब्वे या दोन आफ्रिकन देशांमध्ये खेळवला जाणार आहे. ही अंडर-19 विश्वचषक स्पर्धेची 16वी आवृत्ती असेल. ही स्पर्धा एकदिवसीय (ODI) फॉर्मेट मध्ये खेळवली जाईल. स्पर्धेची सुरुवात 15 जानेवारी 2026 रोजी होईल आणि अंतिम सामना 6 फेब्रुवारी 2026 रोजी खेळवला जाईल. या स्पर्धेत जगभरातील एकूण 16 संघ भाग घेत आहेत, ज्यांना आयसीसीने प्रत्येकी चार संघांच्या चार गटांमध्ये विभागले आहे. एकूण 23 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 41 सामने खेळले जातील.

india vs pakistan
T20 World Cup 2026: 'टी20 वर्ल्ड कप'साठी सर्व 20 संघ निश्चित; नेपाळ, ओमाननंतर जपानला हरवून यूएईनं तिकीट केलं पक्क; पाहा संपूर्ण यादी

गट आणि संघांची रचना

भारत आणि पाकिस्तानला वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवून लीग टप्प्यातील त्यांचे थेट आव्हान टाळण्यात आले आहे.

गट आणि संघ

ग्रुप ए- भारत, बांगलादेश, अमेरिका आणि न्यूझीलंड

ग्रुप बी- झिम्बाब्वे, पाकिस्तान, इंग्लंड आणि स्कॉटलंड

ग्रुप सी- ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, जपान आणि श्रीलंका

ग्रुप डी- टांझानिया, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका

india vs pakistan
World Cup Prediction: 'मी 2026 च्या विश्वचषकात खेळेन...' अनकॅप्ड खेळाडूचा दावा कशाच्या आधारावर? प्रीती झिंटाचा आवडता खेळाडू चर्चेत

संपूर्ण विश्वचषक वेळापत्रक (मुख्य सामने)

स्पर्धेचे काही महत्त्वाचे सामने खालीलप्रमाणे आहेत:

तारीख सामना स्थळ

15 जानेवारी- अमेरिका विरुद्ध भारत क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो

15 जानेवारी- पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड ताकाशिंगा स्पोर्ट्स क्लब, हरारे

17 जानेवारी- भारत विरुद्ध बांगलादेश क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो

18 जानेवारी- न्यूझीलंड विरुद्ध अमेरिका क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो

22 जानेवारी- झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तानत ताकाशिंगा स्पोर्ट्स क्लब, हरारे

24 जानेवारी- भारत विरुद्ध न्यूझीलंड क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो

india vs pakistan
FIFA World Cup 2026 Qualifier: छेत्री ब्रिगेडचा कतारकडून दारुण पराभव, पात्रता फेरीचा दुसरा सामना गमावला!

पुढील टप्पे

  • सुपर सिक्स सामने: 25 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान खेळवले जातील. याच टप्प्यात भारत आणि पाकिस्तानचा सामना होण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

  • पहिला सेमीफायनल: 3 फेब्रुवारी, क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो

  • दुसरा सेमीफायनल: 4 फेब्रुवारी, हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे

  • अंतिम सामना (Final): 6 फेब्रुवारी, हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे

भारत आणि पाकिस्तानला लीग टप्प्यात वेगळे ठेवण्यात आले असले तरी, दोन्ही संघ आपापल्या गटात अव्वल कामगिरी करत सुपर सिक्स टप्प्यात पोहोचल्यास, चाहत्यांना भारत-पाकिस्तानचा हाय-व्होल्टेज सामना पाहण्याची संधी मिळू शकते. कारण, अंडर-19 चा सामना असला तरी, या दोन संघांमधील लढतीचे क्रिकेट जगतात नेहमीच मोठे आकर्षण असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com