Ashutosh Masgaunde
FIFA World Cup 2026 ला 11 जूनपासून मेक्सिको सिटीतील प्रतिष्ठित अझ्टेक स्टेडियमवर सुरूवात होईल.
2026 चा फुटबॉल विश्वचषक कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या तीन देशांमध्ये आयोजीत केला जाणार आहे.
या स्पर्धेत एकूण 104 सामने होणार असून तिन्ही देशांतील 16 अत्याधुनिक स्टेडियमध्ये हे सामने 104 रंगणार आहेत.
उपांत्यपूर्व फेरीचे सामने लॉस एंजेलिस, कॅन्सस सिटी, मियामी आणि बोस्टन येथे खेळले जाणार आहेत.
अटलांटा आणि डॅलस येथे उपांत्य फेरीचे आयोजन केले जाणार असून, तिसऱ्या स्थानासाठीचा सामना मियामीमध्ये खेळले जाईल.
अटलांटा, बोस्टन, डॅलस, ग्वाडालजारा, ह्यूस्टन, कॅन्सस सिटी, लॉस एंजेलिस, मेक्सिको सिटी, मियामी, मॉन्टेरी, न्यूयॉर्क-न्यू जर्सी, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को बे एरिया, सिएटल, टोरंटो आणि व्हँकुव्हर.
यापूर्वी1994 चा विश्वचषक देखील युनायटेड स्टेट्समध्ये पार पडला होता आणि अंतिम सामना लॉस एंजेलिस जवळ पासाडेना येथील रोझ बाउल येथे आयोजित करण्यात आला होता.