Gym Viral Video Dainik Gomantak
देश

Gym Viral Video: ठुकरा के मेरा प्यार... जिममध्ये गाणं वाजताच मुलाचा वर्कआउट मोड ऑन, लोक म्हणाले, 'भाऊचा कमबॅक पक्का'

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक मजेदार व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून कोणालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ एका जिममधील आहे.

Sameer Amunekar

सोशल मीडियावर सध्या एक मजेदार व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून कोणालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ एका जिममधील आहे, जिथे अचानक 'ठुकरा के मेरा प्यार' हे सुप्रसिद्ध गाणे वाजू लागते. गाण्याचे सूर कानावर पडताच, जिममधील एक युवक उत्साहाने भरून जातो आणि ताबडतोब जोमाने व्यायाम सुरू करतो.

विशेष म्हणजे, तो युवक व्यायाम करताना योग्य पद्धत पाळत आहे की नाही, याकडे तो अजिबात लक्ष देत नाही. त्याचा फोकस फक्त गाण्याच्या तालावर आपल्या हालचालींना आणण्यावरच असतो. त्याच्या या भन्नाट रिअॅक्शनने जिममधील इतर लोकसुद्धा हसून लोटपोट झाले.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @abhijeet.7.yadav या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि काही तासांतच हजारो लोकांनी तो पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत आपली मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, "आता तर याचे खरे कमबॅक होणार!" तर दुसऱ्याने मजेशीरपणे लिहिले, "भाऊ, गाणे बदला नाहीतर तो वेडा होईल."

नेटिझन्सच्या या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते की हा व्हिडिओ केवळ फिटनेसचाच नाही, तर विनोदाचाही डोस देत आहे. सोशल मीडियावर लोक आता हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करत आहेत आणि हसण्याचा आनंद घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT