Indranil Rajguru  Twitter / @ANI
देश

Gujarat Election: मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करताच 'आप'मध्ये फूट, बड्या नेत्याने सोडली साथ

Indranil Rajguru: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला आहे.

दैनिक गोमन्तक

Gujarat Election: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला आहे. यानंतर पक्ष बदलाचा क्रम सुरु झाला आहे. खरे तर शुक्रवारी ज्येष्ठ नेते इंद्रनील राजगुरु यांनी पुन्हा एकदा पलटी मारली आहे. त्यांनी आम आदमी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, आम आदमी पक्षात (Aam Aadmi Party) येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. ते 'आप'मध्ये राष्ट्रीय सहसचिव होते. त्यांचे पक्षात स्वागत करताना काँग्रेसचे गुजरात प्रभारी रघु शर्मा म्हणाले की, 'इंद्रनील राजगुरु एका विचारसरणीचे होते आणि आज ते पुन्हा त्याच विचारधारेने काम करण्यासाठी काँग्रेस परिवारात सामील होत आहेत.'

राजगुरु म्हणाले की, 'मला नेहमीच वाटत होते की, भाजप (BJP) हा देशासाठी घातक पक्ष आहे. गुजरातमध्ये त्याचा पराभव करणे आवश्यक आहे. म्हणूनच भाजपचा पराभव करण्यासाठी मी 'आप'मध्ये गेलो होतो. परंतु मला कळून चुकले की, जसा भाजप लोकांना मूर्ख बनवतो तसाच AAP देखील लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतो.'

दुसरीकडे, राजगुरु यांनी पक्ष सोडल्यानंतर लगेचच आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी त्यांच्यावर हल्ला केला. पक्षात तिकिटासाठी सौदेबाजी करत असल्याचे त्यांनी सांगितले. 15 विधानसभा जागांवर आपल्या पसंतीचे उमेदवार हवे असण्याबरोबरच मुख्यमंत्रीपदासाठी आपला चेहरा घोषित करण्याची मागणी ते करत होते. पण आम आदमी पार्टी हा जनतेचा पक्ष आहे. त्यांची इच्छा पूर्ण करणे हे आपले कर्तव्य नाही, असेही ते म्हणाले.

तसेच, आम आदमी पक्षाने (AAP) शुक्रवारी गुजरातमध्ये मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून इसुदान गढवी यांची घोषणा केली.

शिवाय, 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज सांगितले की, 'गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने इसुदान गढवी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून उभे केले आहे.' गुजरातमधील 182 विधानसभा जागांपैकी पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी 1 डिसेंबरला आणि उर्वरित 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT