Gujarat Election: कोण आहेत पत्रकारितेतून राजकारणात आलेले इसुदान गढवी, वाचा सविस्तर

Gujarat Election: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.
Isudan Gadhvi
Isudan GadhviDainik Gomantak
Published on
Updated on

Gujarat Election: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. पंजाबमध्ये जसा प्रयोग केला तसाच प्रयोग आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये केला आहे. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून इसुदान गढवी आणि गोपाल इटालिया हे दोन चेहरे पुढे आले होते. परिणामी अरविंद केजरीवाल यांनी इसुदान गढवी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. जाणून घेऊया कोण आहेत इसुदान गढवी...

दरम्यान, इसुदान गढवी यांचा जन्म 10 जानेवारी 1982 रोजी जामनगर जिल्ह्यातील पिपलिया गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील खेराजभाई शेती करतात. राजकारणात येण्यापूर्वी इसुदान गढवी पत्रकार राहिले आहेत. गढवी यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण जाम खंभलिया येथून पूर्ण केले. त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली. त्यानंतर गुजरात (Gujarat) विदयापीठातून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले.

Isudan Gadhvi
Gujarat Election: 'आप' कडून इसुदान गढवी बनले मुख्यमंत्री पदाचा चेहरा

तसेच, इसुदान यांनी गुजरातमधील अनेक माध्यम संस्थांमध्ये काम केले. पोरबंदरमधील एका स्थानिक वाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे ते दूरदर्शनमध्येही रुजू झाले. 2015 मध्ये, इसुदान एका आघाडीच्या गुजराती वाहिनीचे संपादक झाले. या वाहिनीवर त्यांचा 'महामंथन' नावाचा शो खूप गाजला. यामध्ये शेतकरी (Farmer) आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात येत होती.

दुसरीकडे, 'महामंथन' शोमधूनच इसुदान गढवी यांना राज्यस्तरीय मान्यता मिळाल्याचे सांगितले जाते. या शोमध्ये ते सामान्य लोक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न निर्दोष पद्धतीने मांडायचे. हा शो गुजरातमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. पत्रकार म्हणून इसुदान गढवी यांनी अहमदाबाद (Ahmedabad), पोरबंदर, वापी, जामनगर आणि गांधीनगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये वार्तांकन केले.

Isudan Gadhvi
Gujarat Assembly Election: निवडणुकीच्या घोषणेनंतर PM मोदींची होणार रॅली

याशिवाय, इसुदान गढवी यांनी गेल्या वर्षी पत्रकारिता सोडून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर राजकारणातही सर्वसामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. शुक्रवारी आपल्या भाषणात ते म्हणाले की, 'तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि 'आप' ला विजयी करा, जर मी तुमची स्वप्ने पूर्ण करु शकलो नाहीतर तर मी राजकारण सोडेन.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com