Leopard  Dainik Gomantak
देश

Ghaziabad Court: गाझियाबाद कोर्टात घुसला बिबट्या, दोघांवर हल्ला; वकिलांनी काढला पळ

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये आज अचानक एक बिबट्या न्यायालयाच्या आवारात पोहोचला.

Manish Jadhav

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये आज अचानक एक बिबट्या न्यायालयाच्या आवारात पोहोचला. यामुळे कॅम्पसमध्ये खळबळ उडाली. बिबट्याने काही जणांवर हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकांनी तातडीने प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले पथक बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबाद (Ghaziabad) कोर्टाच्या पहिल्या मजल्यावर बिबट्या आल्याने खळबळ उडाली होती. बिबट्याने अनेकांना जखमी केले, त्यानंतर वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी स्वतःला खोल्यांमध्ये बंद करुन घेतले.

बिबट्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. याबाबत तातडीने पोलीस आणि वनविभागाला माहिती देण्यात आली. पोलिसांसह वनविभागाचे पथकही पोहोचले आहे.

दुसरीकडे, पहिल्या मजल्यावर कुठूनतरी बिबट्या आला आणि त्याने अनेकांवर हल्ला करुन जखमी केल्याचे सांगण्यात येत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात काही लोकांचा रक्तबंबाळ होऊन मृत्यू झाला.

कोर्टात (Court) उपस्थित असलेल्या वकिलांनी त्यांच्या सुरक्षेसाठी आजूबाजूला पडलेल्या काठ्या आणि पट्ट्या हातात घेतल्या. हा बिबट्या अधिक आक्रमक असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुमारे 1 वर्षापूर्वी न्यायालयाजवळील राजनगर येथील सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद झाला होता.

दुसरीकडे, हा प्रकार पाहताच न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. घबराटीचे वातावरण असताना लोक धावू लागले. या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. माहिती मिळताच अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

तसेच, कोर्टाच्या आवारात उपस्थित असलेल्या वकिलाने सांगितले की, बिबट्याने दोन जणांना जखमी केले आहे.

तो अजूनही न्यायालयाच्या आवारातच आहे. त्याचबरोबर माहिती मिळाल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी पथके प्रयत्न करत आहेत. बिबट्याबाबत अजूनही दहशतीचे वातावरण आहे.

गाझियाबादमध्ये दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वेवर बिबट्या मृतावस्थेत आढळला

याआधी, गाझियाबादमधील दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर भोजपूर परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला होता.

गाझियाबादहून मेरठला जाणाऱ्या रस्त्यावरील कलचीना गावाजवळ ही घटना घडली. येथे बिबट्या रस्ता ओलांडत असताना त्याला एका वाहनाने धडक दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. प्रादेशिक वन अधिकारी लातूर सिंह यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.

शिवाय, रस्त्यात मृतावस्थेत आढळलेला बिबट्या मेरठ भागातील असल्याचे सांगण्यात आले, तो गेल्या 10 दिवसांपासून तिथे फिरत होता. त्याला पकडण्यात वनविभागही अपयशी ठरत होता. हा बिबट्या शेतातून एक्स्प्रेस वेपर्यंत पोहोचला असावा, असा अंदाज होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT