Uttar Pradesh News: उंदरांनी खाल्ला 90 लाखांचा गांजा! मथुरा पोलिस न्यायालयात म्हणाले...

Rats ate Ganja Mthura Case: पोलीस ठाण्यातील गोदामात ठेवलेला 581 किलो गांजा उंदरांनी खाल्ल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
Rats
RatsDainik Gomantak

Mathura Ganja Case: तुम्ही जगभरात अनेक प्रकारच्या केसेस ऐकल्या असतील, पण मथुरेसारखी ही अनोखी केस तुम्ही कधीच ऐकली नसेल. मथुरेतून एक बातमी आली आहे. मथुरा पोलिसांनी न्यायालयात दिलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. पोलीस ठाण्यातील गोदामात ठेवलेला 581 किलो गांजा उंदरांनी खाल्ल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. एडीजे सप्तम यांच्या न्यायालयात यासंबंधी अहवाल सादर करण्यात आला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मथुरा पोलिसांनी शेरगड आणि महामार्गावरुन 581 किलो गांजा जप्त केला होता, त्यापैकी 386 किलो गांजा शेरगडमधून जप्त करण्यात आला होता आणि 195 किलो गांजा पोलिस स्टेशन महामार्गावरुन 2018 साली जप्त करण्यात आला होता. एडीजे सप्तम यांनी पोलिसांना गांजाची सीलबंद पाकिटे न्यायालयासमोर (Court) आणण्याचे आदेश दिले होते. मात्र पोलिसांनी गांजा सादर केला नाही, उलट एक अहवाल दिला, ज्यामध्ये 581 किलो गांजाचा काही भाग उंदरांनी खाल्ला आणि उरलेला गांजा जाळला असे म्हटले आहे. पोलिसांचे (Police) हे वक्तव्य ऐकून सर्वांचेच कान टवकारले. आता 26 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने पोलिसांना संबंधित पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Rats
Uttar Pradesh: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा भाजप नेत्यावर आरोप

एडीजे सप्तम

जेव्हापासून मथुरा पोलिसांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे, तेव्हापासून हे प्रकरण थंड होण्याचे नाव घेत नाहीये. आता पोलीस न्यायालयासमोर कोणते पुरावे सादर करतात हे पाहावे लागेल. महामार्ग निरीक्षक छोटे लाल यांनी सांगितले की, 7 ऑक्टोबर 2022 रोजी पावसामुळे पोलिस स्टेशनमध्ये पाणी भरले होते, त्यामुळे गांजा खराब झाला होता. पावसाच्या पाण्याने खराब झालेला गांजा अजूनही पोलिस ठाण्यातच असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Rats
Uttar Pradesh: 'मी पाकिस्तानातून आले नाही...', महिला अधिकारी गावकऱ्यांवर भडकली!

दुसरीकडे, मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, या गांजाची एकूण किंमत सुमारे 90 लाख रुपये आहे. काही वर्षांपूर्वी बिहारमधूनही (Bihar) अशीच एक बातमी समोर आली होती, ज्यामध्ये करोडो रुपयांची दारु उंदीर खात असल्याचे सांगण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com