Uttar Pradesh: यूपी पोलिसांचा क्रूर चेहरा आला समोर, इन्स्पेक्टरने महिलेला दिली थर्ड डिग्री

Uttar Pradesh News: यूपी पोलिसांचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.
Woman
WomanDainik Gomantak
Published on
Updated on

UP Police: यूपी पोलिसांचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. हमीरपूरमध्ये इन्स्पेक्टरने महिलेसोबत जे केले ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. पतीने केलेल्या चोरीच्या आरोपामुळे पत्नी पोलिसांच्या अत्याचाराला बळी पडली. तीन दिवसांपूर्वी पतीच्या शोधात छापा टाकण्यासाठी आलेल्या रथ पोलिसांनी पती न सापडल्याने पत्नीला घरातच बेदम मारहाण केली.

दरम्यान, पोलीस (Police) अधिकाऱ्याने महिलेला घराबाहेर काढले. त्यानंतर घराची तोडफोड करण्यात आली. घराच्या तोडफोडीनंतर पोलिस अधिकाऱ्याने महिलेला कोतवालीत नेले. आणि कोतवालीतच या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक बाब समोर येताच एसपींनी आरोपी पोलिस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केले. यासोबतच या प्रकरणाचा तपास सीओ राठा यांच्याकडे सोपवण्यात आला. या प्रकरणामध्ये आणखी काही लोकांवर कारवाई होऊ शकते.

Woman
Uttar Pradesh:लखनऊमधील लुलू मॉल मध्ये नमाज पठण करणाऱ्या चार जणांना अटक

महिलेच्या पतीचा शोध घेत पोलीस अधिकारी घरी पोहोचले

पीडित महिलेला पोलिसांनी (Police) शनिवारी सीएचसीमध्ये आणले. पीडितेने कोतवाली पोलिसांवर गंभीर आरोप करत सांगितले की, 'तीन दिवसांपूर्वी रथ कोतवालीचे इन्स्पेक्टर आणि इतर पोलिस कर्मचारी पती सीताराम यांना चोरीच्या आरोपावरुन पकडण्यासाठी घरी आले होते. त्याचवेळी मी भाजी घेऊन घरी पोहोचले. त्यानंतर तिथे पोहोचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी मला मारहाण केली. बेदम मारहाणीनंतर माझ्या घराची तोडफोड करण्यात आली. घराच्या तोडफोडीनंतर त्यांनी मला कोतवालीत आणले, जिथे मला तीन दिवस बेकायदेशीर कोंडून ठेवले.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

8th Pay Commission Latest Update
Girl Dancing In Moving Local Train
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com