Former Deloitte India Chairman P R Ramesh  Dainik Gomantak
देश

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

Former Deloitte India Chairman P R Ramesh Joins VerSe Innovation: भारतातील आघाडीची स्थानिक भाषा तंत्रज्ञान कंपनी 'VerSe Innovation' ने आपल्या संचालक मंडळात एका दिग्गज व्यक्तिमत्वाची भर घातली.

Manish Jadhav

P R Ramesh Joins VerSe Innovation: भारतातील आघाडीची स्थानिक भाषा तंत्रज्ञान कंपनी 'VerSe Innovation' ने आपल्या संचालक मंडळात एका दिग्गज व्यक्तिमत्वाची भर घातली. कंपनीने 31 मार्च 2026 रोजी पी. आर. रमेश यांची 'स्वतंत्र संचालक' म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे त्यांच्याकडे कंपनीच्या ऑडिट कमिटीच्या अध्यक्षपदाचीही धुरा सोपवण्यात आली. 'डेलीहंट' (Dailyhunt) आणि 'जोश' (Josh) सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मची मातृकंपनी असलेल्या VerSe साठी हा निर्णय भविष्यातील विस्तार आणि पारदर्शक कारभाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

पी. आर. रमेश हे भारतीय कॉर्पोरेट जगतातील एक प्रतिष्ठित नाव असून त्यांना चार्टर्ड अकाउंटंट म्हणून 40 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी 'डेलॉइट इंडिया'चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून ते डेलॉइट ग्लोबल बोर्डाचे सदस्यही राहिले आहेत. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी एअर इंडिया, सिप्ला, नेस्ले इंडिया, लार्सन अँड टुब्रो, आयटीसी हॉटेल्स आणि एचडीएफसी सारख्या दिग्गज कंपन्यांच्या बोर्डावर आपली सेवा दिली. इतकेच नाही तर, सेबी (SEBI), आरबीआय (RBI) आणि इर्डा (IRDAI) सारख्या नियामक संस्थांच्या विविध समित्यांमध्येही त्यांनी धोरणात्मक योगदान दिले. त्यांच्या याच कार्याची दखल घेत 2022-23 मध्ये त्यांना 'सर्वोत्कृष्ट स्वतंत्र संचालक' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

VerSe Innovation मध्ये त्यांची भूमिका केवळ आर्थिक लेखापरीक्षणापुरती मर्यादित नसेल. रमेश यांच्या नेतृत्वाखालील ऑडिट कमिटी कंपनीच्या आर्थिक अहवालांची अचूकता, अंतर्गत नियंत्रण यंत्रणा, जोखीम व्यवस्थापन आणि नियामक अनुपालन (Regulatory Compliance) यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. कंपनीच्या पुढील वाढीच्या टप्प्यात गुंतवणूकदारांचा (Investors) विश्वास संपादन करण्यासाठी आणि कंपनीचा कारभार अधिक जबाबदार आणि पारदर्शक करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीबद्दल बोलताना VerSe Innovation चे सह-संस्थापक उमंग बेदी यांनी नमूद केले की, कोणतीही संस्था दीर्घकाळ टिकवण्यासाठी मजबूत 'गव्हर्नन्स' पाया असावा लागतो. रमेश यांचा जागतिक स्तरावरील ऑडिट आणि नियामक प्रणालींचा अनुभव कंपनीला जागतिक दर्जाचे मानके प्रस्थापित करण्यास मदत करेल. तर दुसरीकडे, पी. आर. रमेश यांनी व्यक्त केले की, VerSe ने भारतात डिजिटल व्यवसायाचे मोठे जाळे विणले आणि अशा मोठ्या व्यापासोबतच नैतिक जबाबदारीही वाढते. कंपनीच्या नेतृत्व टीमसोबत काम करुन मजबूत आर्थिक नियंत्रणे आणि जोखीम व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यास आपण उत्सुक आहोत, असे त्यांनी सांगितले.

VerSe Innovation ही कंपनी प्रामुख्याने एआय-चालित (AI-powered) स्थानिक भाषा प्लॅटफॉर्मसाठी ओळखली जाते. गुगल, मायक्रोसॉफ्ट, गोल्डमन सॅक्स आणि कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड यांसारख्या जागतिक गुंतवणूकदारांची साथ लाभलेली ही कंपनी भारतातील स्थानिक भाषा तंत्रज्ञान क्षेत्रातील पहिल्या 'युनिकॉर्न'पैकी एक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंगच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीय वापरकर्त्यांना त्यांच्या भाषेत आशय पोहोचवण्याचे काम ही कंपनी करत आहे. आता रमेश यांच्यासारख्या अनुभवी मार्गदर्शकाच्या येण्याने कंपनीचा पाया अधिक भक्कम झाला असून वेगवान प्रगती आणि जबाबदार व्यवस्थापन यांचा समतोल साधण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT