Calcutta High Court Dainik Gomantak
देश

''माय लॉर्ड पुरुषांच्या प्रवेशावर बंदी घाला, तुरुंगात महिला कैदी होतायेत गर्भवती''; मुख्य न्यायाधीशांना विनंती

West Bengal News: ॲमिकस क्युरींनी कलकत्ता उच्च न्यायालयात सादर केलेल्या त्यांच्या अहवालात पश्चिम बंगालच्या तुरुंगात बंद असलेल्या महिला कैदी गर्भवती होत असल्याचे म्हटले आहे.

Manish Jadhav

Calcutta High Court:

पश्चिम बंगालच्या तुरुंगातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यभरातील सर्व सुधारगृहांच्या ॲमिकस क्युरींनी कलकत्ता उच्च न्यायालयात सादर केलेल्या त्यांच्या अहवालात पश्चिम बंगालच्या तुरुंगात बंद असलेल्या महिला कैदी गर्भवती होत असल्याचे म्हटले आहे. उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, कारागृहात महिला कैदी गर्भवती होत असून त्यामुळे राज्यभरातील कारागृहांमध्ये किमान 196 बालकांचा जन्म झाला आहे.

ॲमिकस क्युरी यांनी गुरुवारी या प्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाचे (High Court) मुख्य न्यायमूर्ती टीएस शिवगणनम आणि न्यायमूर्ती सुप्रतीम भट्टाचार्य यांच्या खंडपीठासमोर दोन नोट्स ठेवल्या. पहिल्या नोटचा तिसरा परिच्छेद वाचताना ॲमिकस क्युरी म्हणाले की, “माय लॉर्ड, हे जाणून आश्चर्य वाटेल की महिला कैदी तुरुंगात असताना गर्भवती होत आहेत. तुरुंगात मुलेही जन्माला येत आहेत. सध्या 196 मुले पश्चिम बंगालच्या विविध तुरुंगात आहेत.''

यासोबतच ॲमिकस क्युरी यांनी मुख्य न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील खंडपीठाला विनंती केली की, सुधारगृहात पुरुषांच्या प्रवेशावर तात्काळ बंदी घालण्यात यावी. त्यांनी पुढे असेही सांगितले की, “अलीकडेच मी सुधारगृहांचे महानिरीक्षक (विशेष) आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांसह महिला सुधारगृहाला भेट दिली. तिथे मला दिसून आले की, एक गर्भवती महिला आणि इतर किमान 15 महिला कैदी त्यांच्या मुलांसोबत राहत आहेत. त्या मुलांचा जन्म तुरुंगातच झाला.''

यानंतर मुख्य न्यायमूर्ती टीएस शिवगणनम आणि न्यायमूर्ती सुप्रतीम भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे सोपवले. ॲमिकस क्युरी जेव्हा या प्रकरणाबद्दल सांगत होते, तेव्हा सरकारी वकीलही तिथे उपस्थित होते. रेकॉर्डवरील नोंदी घेत खंडपीठाने म्हटले की, “ॲमिकस क्युरीने संदर्भित केलेली प्रकरणे गंभीर समस्यांकडे लक्ष वेधतात. कारागृहात असताना महिला कैदी गर्भवती होत आहेत आणि सध्या 196 मुले पश्चिम बंगालच्या विविध कारागृहात राहत आहेत."

पश्चिम बंगाल सुधार सेवांच्या एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, सहा वर्षांखालील मूल असलेल्या महिलेला अटक केल्यास, मुलाला आईसोबत तुरुंगात राहण्याची परवानगी दिली जाते. ते पुढे म्हणाले की, "सहा वर्षांखालील मुलांना तुरुंगात त्याच्या आईसोबत राहण्याची परवानगी आहे, परंतु तुरुंगात महिला (Women) गर्भवती झाल्याची मला माहिती नाही. हे संभवत नाही. माझ्या निदर्शनास आल्यास मी त्याकडे नक्कीच लक्ष देईन."

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2024 पर्यंत पश्चिम बंगालच्या 60 तुरुंगांमध्ये सुमारे 26000 कैदी राहत होते. यापैकी सुमारे 8% ते 10% महिला कैदी आहेत. जानेवारीपर्यंत, किमान 1,265 अंडरट्रायल महिला कैदी आणि 448 दोषी राज्य कारागृहात बंद आहेत. सुमारे 174 महिला कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. आता या प्रकरणावर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT