Calcutta High Court: 'या' वकिलाला ओळखता का? कोर्टरुममध्ये थेट न्यायाधीशांनाच प्रश्न विचारल्यानं सर्वच आवाक्

Calcutta High Court: वकील प्रियंका टिब्रेवालचा शोध घेत असताना एक व्यक्ती कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गांगुली यांच्या कोर्टरुमध्ये पोहोचली.
Calcutta High Court
Calcutta High CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Calcutta High Court: कोलकाता उच्च न्यायालयात शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली. वकील प्रियंका टिब्रेवालचा शोध घेत असताना एक व्यक्ती कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गांगुली यांच्या कोर्टरुमध्ये पोहोचली.

त्या व्यक्तीने न्यायमूर्ती अभिजित गांगुली यांना वकील प्रियंका टिबरेवालबद्दल विचारण्यास सुरुवात केली.

यावर नाराजी व्यक्त करत न्यायमूर्ती म्हणाले की, ते कुठे आहेत मला कसे माहिती? असे असतानाही ती व्यक्ती गप्प बसली नाही, तेव्हा न्यायमूर्ती गांगुली यांनी त्याला अटक करण्याची चेतावणी दिली.

नंतर पोलिसांनी त्याला तेथून हटवले, मात्र या घटनेमुळे न्यायालयातील न्यायमूर्तींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, न्यायालयातील प्राथमिक सुनावणी नुकतीच संपली होती. न्यायमूर्ती अभिजित गांगुली यांचे कोर्टरुमचे वकील जेवणासाठी एक एक करत बाहेर जात होते. अशा वेळी सर्वाना हटवत एक अनोळखी व्यक्ती न्यायमूर्तींसमोर आली.

प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, स्वत:ची डॉक्टर (Doctor) अशी ओळख सांगणारा हा व्यक्ती न्यायमूर्ती अभिजित गांगुली यांच्याजवळ पोहोचला होता, जिथे फक्त न्यायालयीन अधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जातो.

Calcutta High Court
Calcutta High Court: 'असे प्रकार अमान्य, कोणताही धर्म तुम्हाला असे करण्यास सांगत नाही..' मुहर्रमदरम्यान ढोल वाजवण्यावर कोलकाता HC चे निर्बंध

ती व्यक्ती न्यायाधीशापासून काही हातांच्या अंतरावर पोहोचली

काही हातांच्या अंतरावर एक अनोळखी व्यक्ती पाहून न्यायमूर्तीनींही आश्चर्य वाटले. त्या व्यक्तीने न्यायमूर्तींना विचारले की, "अधिवक्ता प्रियंका टिबरेवाल कुठे आहे?" सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांचा शोध घेतला, मात्र त्या सापडल्या नसल्याची त्याने सांगितले.

यावर, न्यायमूर्ती अभिजित गांगुली चांगलेच भडकले. न्यायमूर्ती म्हणाले की, “मी कसे सांगू? तुम्ही वकिलांना विचारा.'' त्यावर तो पुन्हा न्यायमूर्तींना म्हणाला की, “तुम्ही असे म्हणू नका, त्या चांगल्या आहेत. त्यांना खूप शोधलं पण त्या सापडल्या नाहीत.

यातच, न्यायालयाचे शेरीफ कोर्टरुममध्ये पोहोचले. तुम्हाला अटक होऊ शकते, अशी चेतावणी न्यायमूर्तींनी त्या व्यक्तीला दिली.

Calcutta High Court
Calcutta High Court: 'तुम्ही नागरिकांचे संरक्षण करु शकत नसाल तर...', हायकोर्टाने ममता सरकारला फटकारले

न्यायालयातील न्यायाधीशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे

यातच तात्काळ एक पोलीस (Police) अधिकारी कोर्ट रुममध्ये आला आणि तो त्या तेथून व्यक्तीला घेऊन गेला. बाहेर उभ्या असलेल्या या व्यक्तीने स्वतःची ओळख डॉक्टर अशी करुन दिली. न्यायालयातील अनेकांनी त्याला बराच वेळ खुर्चीवर बसलेले पाहिले होते.

मात्र, न्यायमूर्तींच्या खुर्चीपासून अगदी थोड्याच अंतरावर हा व्यक्ती ज्या प्रकारे पोहोचला आहे, त्यामुळे वकिलांच्या एका वर्गाने कोर्टरुममधील न्यायमूर्तींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वकील म्हणाले की, यापूर्वी देशाच्या विविध भागांत न्यायालयांवर हल्ले झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे हा मुद्दा हलक्यात घेऊ नये. संबंधित व्यक्तीने आपण डॉक्टर असल्याचा दावा केला आहे.

प्रियंका टिबरेवाल यांना शोधत असताना तो न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांच्या कोर्टरुममध्ये पोहोचला होता का, याचा तपास पोलिस करत आहेत. याबाबत त्याच्याकडे विचारणाही करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com