Eid Al Adha 2022 ANI
देश

Eid Al Adha 2022: गोव्यासह दिल्लीत बकरी ईद उत्साहात साजरी

Eid Al Adha 2022: बकरी-ईदनिमीत्त दिल्लीसह देशभरात अनेक ठिकाणी उत्साहात साजरी केली जात आहे.

दैनिक गोमन्तक

आज देशभरात बकरीदचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. मुस्लिम धर्मात बकरी-ईद सणाला खूप महत्त्व आहे. या सणाला ईद-उल-अजहा किंवा बलिदानाचा सण असेही म्हणतात. रमजानच्या पवित्र महिन्याच्या 70 दिवसांनी बकरी-ईद (Eid Al Adha 2022) साजरी केली जाते. बकरीदची तारीख चंद्राच्या दर्शनाने ठरवली जात असली तरी आज संपूर्ण भारतात बकरी-ईद साजरी होणार आहे. (Eid Al Adha 2022 News)

ईद उल अजहा किंवा बकरी ईद हा इस्लामचा दुसरा सर्वात मोठा सण आहे. जो मुस्लिम समाजातील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. इस्लामिक कॅलेंडरनुसार 12व्या महिन्यात बकरीद साजरी केली जाते. रमजानचा महिना संपल्यानंतर 70 दिवसांनी हा सण साजरा केला जातो. या दिवशी नमाज अदा केल्यानंतर कुर्बानी दिली जाते. बकरीदच्या सणाला बकरीद, ईद कुर्बान, ईद-उल-अधा किंवा कुर्बान बायरामी असेही म्हणतात. यावेळी दिल्लीतील (Delhi) जामा (Jama Masjid) मशिदीत नमाज (Namaz) अदा करण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

पोलिसांच्या देखरेखीखाली उदयपूरमध्ये साजरी होणार ईद

उदयपूरमध्ये कन्हैयालालच्या हत्येनंतर पुन्हा वातावरण बिघडू नये म्हणून पोलीस-प्रशासनाचे प्रमुख रस्त्यावर गस्त घालत आहेत. उदयपूरमध्ये (Udaipur) 28 जून रोजी कन्हैया लालच्या निर्घृण हत्येनंतर सध्या सर्वत्र शांतता आहे. परंतु प्रत्येकाच्या कपाळावर एकच चिंतेची रेषा आहे की, कोणतीही अनुचित घटना घडू नये. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जम्मु- काश्मिरमध्ये ईदगाह येथे नमाज अदा केली.

बकरी ईदनिमित्ताने ताज-उल-मशीद येथे भाविकांनी केले नमाजाचे पठन

गोव्यात (Goa) राजधानी पणजीमध्ये जामा मशिदमध्ये नमाज पठन

* बकरी-ईद चा इतिहास

इस्लामनुसार हजरत इब्राहिम हे एकेकाळी अल्लाहचे पैगंबर होते. त्यांनी नेहमी अल्लाहने दाखवलेल्या सत्याच्या मार्गावर चालले. त्यांनी सर्वांवर प्रेम केले आणि इतरांना अल्लाहच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली.

एके दिवशी, एका स्वप्नात, अल्लाह आला आणि त्याला त्याच्या सर्वात प्रिय वस्तूचा बळी देण्याचा आदेश दिला. हजरत इब्राहिम यांचे पुत्र इस्माईलवर सर्वात जास्त प्रेम होते. हजरत साहिबांनी आत्मबलिदान देण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलाचा बळी देताना त्याचा हात थांबू शकला नाही, म्हणून पैगंबराने डोळ्यांवर पट्टी बांधली आणि चाकू वापरला आणि जेव्हा त्याने पट्टी काढली तेव्हा इस्माईल सुरक्षित होता आणि त्याच्या जागी एक मेंढी पडली होती. तेव्हापासून बलिदान देण्याची प्रथा सुरू झाली जी आजही पाळली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

SCROLL FOR NEXT