आगामी काळात भारतात फक्त इलेक्ट्रिक वाहनं रस्त्यावर दिसतील - मंत्री नितीन गडकरी

सर्व वाहनं, इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन आणि सीएनजीवरच चालतील
Nitin Gadkari
Nitin GadkariDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या इंधन दराचा उडालेला भडका आणि दिवसेंदिवस वाढत असलेले इंधनाचे दर सामान्य नागरिकांचा किस्सा वेगाने रिकामा करत आहेत. यावर देशातील नागरिकांसाठी एक दिलासा देणारं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांनी कोणत्या प्रकारची वाहनं वापरावीत यावर भाष्य केले आहे. (only electric vehicles will be seen running on the roads in India - Union Minister Nitin Gadkari )

Nitin Gadkari
उत्तरप्रदेशातील या शहरात एड्सच्या विळख्यात मुले, रुग्णांची संख्या 200 च्या पार

मंत्री गडकरी म्हणाले की, तुमच्याकडे कार आणि बाईक असेल तर पुढील पाच वर्षानंतर तुम्हाला पेट्रोल मिळेल की नाही याची शाश्वती नाही. कारण पुढील 5 वर्षात देशात पेट्रोलचा वापर संपुष्टात येऊ शकतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोठं विधान केलंय.

येत्या पाच वर्षात देशातून पेट्रोलचा वापरच संपुष्टात येईल असा दावा गडकरींनी केलाय. वाहनांमध्ये हळूहळू बायो-इथेनॉलचा वापर वाढतोय. याशिवाय विहिरीच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन बनवता येत आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनं, इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन आणि सीएनजीवरच चालतील असंही गडकरींनी म्हटलंय.

Nitin Gadkari
Sudhakar Dalela बनले भूतानचे नवे राजदूत

आगामी काळात भारतात इलेक्ट्रिक वाहनंच रस्त्यावर धावताना दिसण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या संख्येत वाढ होऊ शकते, असा अंदाज वाहन विषयक अभ्यास करणाऱ्या डेलॉईटनं व्यक्त केलाय. या अहवालात 59 टक्के भारतीय प्रदूषणाबाबत चिंतेत असल्याचंही नमूद करण्यात आलंय.

गडकरींच्या दाव्याप्रमाणे येत्या काळात लोकांचा कल इलेक्ट्रिक आणि ग्रीन हायड्रोजनवर चालणा-या गाड्यांकडेच असेल. तसं झालं तर पेट्रोल-डिझेलची गरजच संपुष्टात येईल यात शंका नाही असे ही ते यावेळी म्हणाले. त्यामूळे भारत सरकार आता ई- वाहनांवर किती गांभिर्याने विचार करते आहे. याची एक झलक मंत्री गडकरी यांच्या या विधानाने समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com