Election Commission Dainik Gomantak
देश

ECINET App: निवडणूक आयोगाने लॉन्च केले 'डिजिटल अ‍ॅप', आता नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार सर्व माहिती

Election Commission digital platform: भारतीय निवडणूक आयोगाने एक मोठे पाऊल उचलले. आयोगाने एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केले. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Manish Jadhav

भारतीय निवडणूक आयोगाने एक मोठे पाऊल उचलले. आयोगाने एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केले. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आयोगाच्या या पावलामुळे कोट्यवधी मतदार, निवडणूक अधिकारी आणि विविध पक्षांच्या नेत्यांना मोठा फायदा होणार आहे. हे नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म अनेक कामे खूप सोपी करणार आहे.

'ECINET' नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म

निवडणूक आयोगाने (Election Commission) 'ECINET' नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु केले. देशभरातील कोट्यवधी लोक अॅप आणि वेबद्वारे या प्लॅटफॉर्मचा वापर करु शकतील. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने निवडणुकीशी संबंधित अनेक कामे एकाच ठिकाणी करता येतील. रविवारी (4 मे) निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली.

निवडणुकीशी संबंधित कामे सोपी होणार

ECINET या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे निवडणुकीशी संबंधित अनेक कामे सोपी होणार आहेत, याचा अंदाज तुम्ही यावरुन लावू शकता की, वेगवेगळ्या अॅप्स आणि वेबवर उपलब्ध असलेल्या सुमारे 40 सेवांचा लाभ आता एकाच ठिकाणी घेता येईल. ECINET वर यूजर्स Voter Helpline, Voter Turnout, CVIGIL, Suvidha 2.0, ESMS, Saksham आणि KYC चे काम सहजपणे करता येईल.

100 कोटींहून अधिक लोकांना फायदा होणार

ECINET लॉन्च झाल्यानंतर मोबाईल वापरकर्त्यांना निवडणुका किंवा निवडणूक आयोगाशी संबंधित विविध कामांसाठी अनेक अॅप्स इन्स्टॉल करण्याची आवश्यकता राहणार नाही. याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे वापरकर्त्यांना वेगवेगळ्या अॅप्ससाठी आयडी किंवा पासवर्ड लक्षात ठेवावा लागणार नाही. निवडणूक आयोगाच्या या एकाच प्लॅटफॉर्मवर थेट फायदा संपूर्ण निवडणूक प्रणालीला तसेच सुमारे 100 कोटी मतदारांना होईल. ECINET चा प्रस्ताव काही काळापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एका बैठकीत दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT