Election Commission: 'विकसित भारत'चे मेसेज व्हॉट्सॲपवर पाठवणे तात्काळ थांबवा; निवडणूक आयोगाचे सरकारला निर्देश

Lok Sabha Elections 2024: निवडणूक आयोगाने ‘विकसित भारत संपर्क’ या बॅनरखाली केंद्र सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकणाऱ्या व्हॉट्सॲप मेसेजवर बंदी घातली आहे.
Election Commission of india
Election Commission of indiaDainik Gomantak

Lok Sabha Elections 2024:

निवडणूक आयोगाने ‘विकसित भारत संपर्क’ या बॅनरखाली केंद्र सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकणाऱ्या व्हॉट्सॲप मेसेजवर बंदी घातली आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा आणि आदर्श आचारसंहिता (MCC) लागू होऊनही सरकारच्या यशाबद्दलचे मेसेज नागरिकांच्या फोनवर पाठवले जात असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. यानंतर, निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (MeitY) या व्हॉट्सॲप मेसेजवर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, पीएम मोदींचे पत्र 'विकास भारत संकल्प' नावाच्या व्हेरिफाईड व्हॉट्सॲप अकाउंटद्वारे मोठ्या संख्येने लोकांना पाठवले गेले आहे. त्यात लिहिण्यात आले आहे की, "हे पत्र पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारच्या विकास भारत संपर्क केंद्राने पाठवले आहे. गेल्या दहा वर्षांत देशातील 80 कोटींहून अधिक नागरिकांनी थेट योजनांचा लाभ घेतला आहे. भारत सरकार आणि भविष्यातही हा लाभ मिळत राहील. विकसित भारताचा (India) संकल्प पूर्ण करण्यासाठी तुमचा पाठिंबा आणि तुमच्या सूचना खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तुम्ही योजनांबाबत तुमची मते द्यावीत, ही विनंती.''

Election Commission of india
Election Commission: सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त

निवडणूक आयोगाकडून सूचना मिळाल्यानंतर, MeitY ने आयोगाला सांगितले की, ''आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही पत्रे पाठवण्यात आली होती. तथापि, त्यापैकी काही संदेश प्रणाली आणि नेटवर्क समस्यांमुळे लोकांपर्यंत उशिरा पोहोचले आहेत.'' आयोगाने MeitY ला या प्रकरणाचा अनुपालन अहवाल त्वरित सादर करण्यास सांगितले आहे.

Election Commission of india
Election Commission: निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींसाठी ॲडव्हायजरी जारी; PM मोदींविरोधात भाषणबाजी पडली महागात

दुसरीकडे, 19 मार्च रोजी मुख्य निवडणूक अधिकारी चंदीगड यांनी केंद्र सरकारच्या "कामांवर" प्रकाश टाकणाऱ्या "विकास भारत संपर्क" च्या बॅनरखाली मोठ्या प्रमाणात व्हॉट्सॲप मेसेज पाठवल्याबद्दल "योग्य कारवाईसाठी" तक्रार निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली होती. तक्रारीची चौकशी केल्यानंतर आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचे प्रथमदर्शनी पुरावे मिळाले. गेल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ही तक्रार पोल पॅनलच्या 'CVigil' मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे प्राप्त झाली होती. मात्र, या प्रकरणावरील अधिकृत निवेदनात तक्रारदाराचा उल्लेख नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com