Delhi Restaurant Fire Dainik Gomantak
देश

Delhi Restaurant Fire: दिल्लीत रेस्टॉरंटला भीषण आग, 21 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांचा समावेश VIDEO

Delhi Malviya Nagar Restaurant Fire: दिल्लीतील मालवीय नगर भागातील 'लेमन ग्रीन' नावाच्या एका बहुमजली रेस्टॉरंटला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली.

Manish Jadhav

Delhi Malviya Nagar Restaurant Fire: दिल्लीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. येथील मालवीय नगर भागातील 'लेमन ग्रीन' नावाच्या एका बहुमजली रेस्टॉरंटला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेत 21 लोकांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दुर्घटनेत जीव गमावलेले बहुतांश लोक हे दक्षिण आफ्रिकेचे नागरिक असल्याचे सांगितले जात आहे.

दिल्ली (Delhi) अग्निशमन सेवेला बुधवारी सकाळी 9 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास या रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली. माहिती मिळताच दमकल विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रेस्टॉरंटच्या बेसमेंटमध्ये अनेक लोक अडकले होते, ज्यांना अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन सुखरुप बाहेर काढले. या दुर्घटनेत जे लोक गंभीररित्या भाजले गेले आहेत, त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या जखमींची प्रकृती नेमकी कशी आहे, याबद्दलची सविस्तर माहिती डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

नेहरु प्लेस (एनआरएन) फायर स्टेशनचे विभागीय अधिकारी रवींद्र यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळी उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रेस्टॉरंटमधील आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 10 गाड्या पाचारण करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर आता आगीवर पूर्णपणे काबू मिळवण्यात यश आले. मात्र, इमारतीमध्ये अद्यापही काही लोक अडकले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर शोध आणि बचाव मोहीम राबवली जात आहे. आगीच्या तीव्रतेमुळे संपूर्ण इमारत काळीठिक्कर पडली.

आम आदमी पक्षाचे स्थानिक नेते सोमनाथ भारती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर करत या भीषण दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख आणि चिंता व्यक्त केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील हौझरानी परिसरातील एका बहुमजली इमारतीला सकाळी भीषण आग लागली असून यामध्ये अनेकांचा मूत्यू झाल्याची शंका आहे, तसेच मृतांमध्ये बहुतांश नागरिक दक्षिण आफ्रिकेचे आहेत. दरम्यान, रेस्टॉरंटला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचे अचूक कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतरही पोलीस आणि अग्निशामक दलाचे अधिकारी घटनास्थळाची कसून पाहणी करत असून, आगीच्या (Fire) मूळ कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT