Delhi Fire: दिल्लीत भीषण अग्नितांडव! चार मजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी, 9 जणांचा होरपळून मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मॅजिस्ट्रेट चौकशीचे आदेश VIDEO

Short Circuit Fire Delhi: दिल्लीतील पालम परिसरात बुधवारी (18 मार्च) पहाटे एका चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Delhi Palam Area Fire
Delhi Palam Area FireANI
Published on
Updated on

Short Circuit Fire Delhi: दिल्लीतील पालम परिसरात बुधवारी (18 मार्च) पहाटे एका चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पालम मेट्रो स्टेशनजवळील गल्ली नंबर 2 मध्ये असलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या कॉस्मेटिकच्या दुकानातून आगीला सुरुवात झाली आणि काही क्षणातच ही आग वरच्या मजल्यांपर्यंत पसरली. या घटनेवेळी इमारतीमध्ये एकूण 18 लोक उपस्थित होते, त्यापैकी अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीवरुन उड्या मारल्या, मात्र आगीच्या वेढ्यात अडकल्यामुळे इतरांना बाहेर पडता आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला या आगीबाबतचा कॉल आला. आगीची भीषणता पाहता तात्काळ 30 अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. इमारतीच्या बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आगीच्या प्रचंड लोंढ्यांनी व्यापल्यामुळे अनेक रहिवासी आतमध्येच अडकून पडले होते. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून काहींना बाहेर काढले, मात्र दुर्दैवाने 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Delhi Palam Area Fire
Delhi To Goa flight: विमानाच्या टॉयलेटमध्ये सिगारेट पेटवली अन…; दिल्ली-गोवा फ्लाइटमध्ये मोठा गोंधळ! प्रवाशावर गुन्हा दाखल

दुसरीकडे, दिल्लीच्या (Delhi) मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या हृदयद्रावक घटनेची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या मॅजिस्ट्रेट चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत 'X' हँडलवरुन या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. "पालममधील इमारतीला लागलेल्या आगीची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. जिल्हा प्रशासन, अग्निशमन दल आणि दिल्ली पोलीस बचाव कार्याचे नेतृत्व करत आहेत. या घटनेच्या सखोल चौकशीसाठी मी मॅजिस्ट्रेट चौकशीचे आदेश दिले आहेत. जखमींच्या प्रकृतीसाठी मी प्रार्थना करते," असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Delhi Palam Area Fire
Delhi Terror Attack: राजधानी दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, होळीपूर्वी 'लष्कर-ए-तैयबा'कडून मोठ्या स्फोटाची तयारी

प्राथमिक तपासानुसार, शॉर्ट सर्किटमुळे तळमजल्यावरील दुकानात आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, इमारतीत अग्निशमन यंत्रणा उपलब्ध होती का आणि बांधकामाचे नियम पाळले गेले होते का, याचा तपास आता मॅजिस्ट्रेट चौकशीत केला जाणार आहे. दाट लोकवस्तीच्या परिसरात ही इमारत असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना पोहोचण्यास सुरुवातीला काही अडचणी आल्या, तरीही दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे आणि कुलिंग ऑपरेशनचे काम सुरु असून, दिल्लीत या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com