Delhi Police: 21 अत्याधुनिक शस्त्रे, 200 काडतुसे जप्त, 10 जणांना ठोकल्या बेड्या; पाकिस्तान-बांगलादेश मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश

International Weapons Smuggling Module: दिल्ली पोलिसांनी एका अत्यंत धोकादायक आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र तस्करी मॉड्यूलचा यशस्वीरीत्या भंडाफोड केला.
Delhi Police Special Cell Arms Bust
Delhi Police Dainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Police Special Cell Arms Bust: दिल्ली पोलिसांनी एका अत्यंत धोकादायक आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र तस्करी मॉड्यूलचा यशस्वीरीत्या भंडाफोड केला. हे रॅकेट थेट पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या शेजारील देशांशी जोडलेले असून त्याद्वारे भारतात अत्याधुनिक परदेशी शस्त्रास्त्रांची तस्करी केली जात होती. या धडक कारवाईमध्ये पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून परदेशात बनवलेल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा आणि जिवंत काडतुसांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण मोहिमेत 21 अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये केवळ पिस्तूलच नव्हे, तर लष्करी दर्जाच्या सब-मशीन गनचाही समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची यादी पाहता, हे रॅकेट किती खोलवर पसरले होते याची प्रचिती येते. यामध्ये चेक प्रजासत्ताकची सब-मशीन गन आणि शॅडो सीझेड पिस्तूल, तुर्कीची स्टोएगर पिस्तूल, चीनची पीएक्स-3, इटलीची प्रसिद्ध बेरेटा, ब्राझीलची टॉरस आणि जर्मनीची वाल्थर यांसारख्या जागतिक दर्जाच्या शस्त्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, विशेष सुरक्षा दलांकडून वापरली जाणारी 'पीएक्स-5.7' ही घातक पिस्तूलही या टोळीकडे सापडली आहे. यासोबतच सुमारे 200 जिवंत काडतुसेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

Delhi Police Special Cell Arms Bust
Delhi Police Arrest 3 Terrorists: दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई, 'ISI'शी संबंधित 3 दहशतवाद्यांना अटक

प्राथमिक तपासात असे समोर आले की, हे मॉड्यूल एका संघटित आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा भाग म्हणून कार्यरत होते. हे टोळी प्रामुख्याने भारतातील (India) गुन्हेगारी जगतातील घटकांना अवैध शस्त्रे पुरवण्याचे काम करत होती. आरोपी शेजारील देशांमध्ये बसलेल्या आंतरराष्ट्रीय हँडलर्स आणि सप्लायर्सच्या सतत संपर्कात होते. हे गट गुप्त मार्गांचा आणि मध्यस्थांचा वापर करुन ही शस्त्रे सीमा ओलांडून भारतात आणत असत. एकदा का ही शस्त्रे भारतात पोहोचली की, ती देशाच्या विविध भागांतील त्यांच्या संपर्कांपर्यंत पोहोचवली जात होती.

Delhi Police Special Cell Arms Bust
Delhi Terror Attack: राजधानी दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, होळीपूर्वी 'लष्कर-ए-तैयबा'कडून मोठ्या स्फोटाची तयारी

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन तपास अधिक तीव्र केला. या नेटवर्कशी संबंधित इतर सहकाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आणि या तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत. या कारवाईमुळे सणासुदीच्या काळात किंवा संवेदनशील काळात मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. शेजारील देशांतून भारतात शस्त्रे पाठवून अस्थिरता निर्माण करण्याचा हा कट पोलिसांनी मोडीत काढला असून, या प्रकरणातील पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com