clash broke out between BJP and SP workers  Twitter @ANINewsUP
देश

भाजपा आणि सापामध्ये आज पुन्हा राडा

उत्तर प्रदेश गट पंचायत अध्यक्षांसाठी होत असलेल्या मतदानावेळी ही घटना घडली आहे.(BJP)

दैनिक गोमन्तक

भाजपा(BJP) आणिसमाजवादी(SP) पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आज पुन्हा राडा झाला आहे.

सुमेरपूर(Uttar Pradesh ) भागात भाजप आणि सपा कार्यकर्त्यांमध्ये आज पुन्हा चकमक उडाली. कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून काढण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

उत्तर प्रदेश गट पंचायत अध्यक्षांसाठी होत असलेल्या मतदानावेळी ही घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशात आज ब्लॉक प्रमुखा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. राज्यात आतापर्यंत 334 ब्लॉक प्रमुख बिनविरोध निवडले गेले आहेत. त्याचबरोबर आज 476 जागांवर मतदान सुरू आहे. भाजपचा दावा आहे की बिनविरोध निवडून आलेल्या349 ब्लॉक प्रमुख पैकी 334 ब्लॉक प्रमुख हे भाजपाचे आहेत, बाकीचे सपा आणि अपक्ष आहेत.

मात्र याच निवडणुकीदरम्यान यूपीच्या काही भागात संघर्ष होण्याची प्रकरणे समोर आली आहेत. मुझफ्फरनगर ब्लॉक प्रमुख निवडणुकीत भाजप आणि विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोंधळ उडाला. भांडण निर्माण करणा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्जे केला.

त्यासोबतच जिल्ह्यातील बुढाणा ब्लॉकच्या मतदान केंद्रावर जाण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला, त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे राहून घोषणाबाजी करत होते . त्याच वेळी, यूपीच्या हमीरपूर जिल्ह्यातूनही गदारोळ झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. अमरोहामध्येही सपा आणि भाजप समर्थकांमध्ये चकमक सुरू आहे.

निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यातून हिंसाचाराच्या घटना उघडकीस आल्या. शुक्रवारी राज्यातील माऊ जिल्ह्यात दोहरीघाट ब्लॉकच्या प्रमुख उमेदवाराने भाजपाला पाठिंबा दर्शविला त्यावरून उपद्रव्यांनी गोळीबारही झाला आहे. निवडणुकीच्या अगदी आधी झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेम शंकर राय हा मधुबन पोलिस स्टेशन परिसरातील कटघरा येथील रहिवासी आहे. तो परिसरातून आपल्या घराकडे परत जात असताना दुचाकीने जाणा-या बदमाश्यांनी त्याला गोळ्या घालून घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान आता या साऱ्या हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता पोलिस सावध झाले असून प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT