Indian Railway: नव्या रेल्वेमंत्र्यांचे नवे फर्मान जारी

रेल्वेची (Indian Railway) मार्च 2020 मधील अधिकृत कर्मचारी संख्या 12 लाख 54 हजार आहे.
INDIAN RAILWAY
INDIAN RAILWAYDainik Gomantak

नवी दिल्ली: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळा बदलण्याच्या योजनेला नरेंद्र मोदी (PM Modi Cabinet) सरकारने अखेर मूर्तरूप दिले आहे. याची सुरवातच रेल्वेपासून (Railway Minister) झाली आहे. रेल्वेचे लाखो कर्मचारी आता सकाळी 7 ते मध्यरात्री 12 अशा दोन शिफ्टमध्ये (पाळ्या) काम करतील. नवे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतचे फर्मान जारी केले आहेत. रेल्वेची मार्च 2020 मधील अधिकृत कर्मचारी संख्या 12 लाख 54 हजार आहे. यात अन्य लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश नाही. (Official number of Indian Railways employees in March 2020 is 12 lakh 54 thousand)

INDIAN RAILWAY
SBI ग्रहकांसाठी महत्त्वाची बातमी, इंटरनेट सेवा 'या' दिवशी राहणार बंद

जे रेल्वे कर्मचारी 10 ते 6 असे कार्यालयीन कामकाज करतात त्यांच्यासाठी हा आदेश आहे. सरकारी कर्मचारी वेळेवर कामावर येत नाहीत, आले तरी पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत, यासारख्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सरकारी कामकाज सकाळी 7 ते मध्यरात्रीपर्यंत 2 शिफ्टमध्ये करण्याची योजना आखली आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी कार्यभार स्वीकारल्यावर दुसऱ्याच दिवशी काढलेल्या आदेशानुसार रेल्वे कर्मचारी आता सकाळी 7 ते दुपारी 4 व दुपारी 3 ते रात्री 12 अशा दोन शिफ्टमध्ये कामकाज करतील.

INDIAN RAILWAY
योगींच्या यूपीत 'गुंडाराज'; बॉंब आणि बंदूकी पाहून पोलिसांनी ठोकली धूम

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com