CBI  Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई, 36 ठिकाणी छापेमारी

CBI: सीबीआयने फायनान्शियल अकाउंट्स असिस्टंट (एफएए) पेपर लीकच्या तपासासंदर्भात जम्मू आणि काश्मीरमधील 6 जिल्ह्यांमध्ये 37 ठिकाणी छापे टाकले आहेत.

दैनिक गोमन्तक

Jammu And Kashmir: सीबीआयने जम्मू-काश्मीरमध्ये मोठी छापेमारी केली आहे. सीबीआयने फायनान्शियल अकाउंट्स असिस्टंट (एफएए) पेपर लीकच्या तपासासंदर्भात जम्मू आणि काश्मीरमधील 6 जिल्ह्यांमध्ये 36 ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयच्या छाप्यात कोणालाही अटक झाल्याची बातमी आतापर्यंत समोर आलेली नाही. सध्या सीबीईची चौकशी सुरु आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी वित्त विभागाने ही परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 6 मार्च रोजी घेतली होती. त्याचा निकाल 21 एप्रिल रोजी आला होता. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अनियमितता आढळून आली होती. निकालात जम्मू, कठुआ आणि इतर जिल्ह्यांमधून सर्वाधिक उमेदवार निवडले गेले. यानंतर यात गडबड होण्याची शक्यता पाहता सीबीआयने (CBI) या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

सीबीआयच्या एका सूत्राने सांगितले की, पेपर लीक केल्याचा आरोप असलेले दलाल, जम्मू-काश्मीर वनरक्षक, सीआरपीएफ कॉन्स्टेबल आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. सीबीआयने नोव्हेंबर 2022 मध्ये या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर रोजी सीबीआयने 14 ठिकाणांवर छापे टाकले होते, जिथे काही कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

जम्मू आणि काश्मीर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (JKSSB) (JKAS), बीएसएफ फ्रंटियर हेडक्वार्टरचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी, पलौरा, खाजगी व्यक्ती, खाजगी कंपनी आणि अज्ञात इतरांसह 20 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, JKSSB द्वारे 6 मार्च 2022 रोजी भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. एफआयआरनुसार, "परीक्षेतील गैरप्रकारांबाबत आरोप झाले होते. विशेष म्हणजे, त्याची चौकशी करण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने एक चौकशी समिती स्थापन केली होती.''

तपासादरम्यान, निवडक हायप्रोफाईल उमेदवारांची प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती सीबीआयला मिळाली.

यापूर्वी या राज्यांमध्ये सीबीआयचे छापे पडले

यापूर्वी, 31 जानेवारीला पेपर लीक प्रकरणी सीबीआयने हिमाचल प्रदेश, बिहार (Bihar), उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, यूपी, हरियाणासह सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 50 ठिकाणी शोध घेतला होता. हिमाचल प्रदेश पोलिसांत हवालदार पदासाठीच्या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या दोन प्रकरणांच्या तपासासंदर्भात हे छापे टाकण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT