Manish Sisodia: एक दिवसांपूर्वी केजरीवालांना नोटीस आज मंत्री सिसोदियांच्या घरी CBI चा छापा

12 जानेवारीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना 164 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस देण्यात आली आहे.
Manish Sisodia
Manish SisodiaDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या कार्यालयावर सीबीआयकडून छापा टाकण्यात आला आहे. मनीष सिसोदिया यांनी दुपारी चार वाजता ट्विट करून याबाबत माहिती दिली.

दरम्यान, 12 जानेवारीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना 164 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस देण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या डीआयपी (Delhi Govt. DIP) सचिवांनी ही वसुली नोटीस पाठवली आहे. तसेच 10 दिवसांच्या आत रुपये जमा करण्यास सांगितले आहे.

Manish Sisodia
Arvind Kejriwal: दहा दिवसात 164 कोटी द्या; अरविंद केजरीवाल यांना वसुलीची नोटीस

सिसोदिया यांनी ट्विटद्वारे छापेमारीबद्दल माहिती दिली आहे. "आज पुन्हा सीबीआय माझ्या कार्यालयात पोहोचली आहे, त्यांचे स्वागत आहे. त्यांनी माझ्या घरावर आणि ऑफिसवर छापे टाकले, काहीही मिळाले नाही. माझ्या गावी जाऊन लॉकरमध्ये शोध घेतला पण काहीही सापडले नाही आणि सापडणार नाही." असे ट्विट सिसोदिया यांनी केले आहे.

Manish Sisodia
Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमक्या, कार्यालयात दाऊदच्या नावाने फोन...

दरम्यान, अशा प्रकारचे छापे टाकले जात नसल्याचे सीबीआयशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे. उत्पादन शुल्क प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे गोळा करण्यासाठी हे पथक सचिवालयात गेले होते आणि नंतर तेथून निघून गेले. असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर सीबीआयचा छापा सुरू आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गाझियाबादमधील पंजाब नॅशनल बँकेच्या लॉकरची झडती घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com