जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील 'गुलमर्ग स्कीइंग रिसॉर्ट'च्या उंचवट्यावर हिमस्खलन झाले आहे. प्रशासनानेच याबाबत माहिती दिली आहे. या अपघातात दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून, 19 परदेशी नागरिकांना वाचविण्यात यश आले आहे. बुधवारी ही घटना घडली.
हिमस्खलनात अडकलेल्या स्कायर्समध्ये सर्व परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, गुलमर्ग फेज 2 परिसरातील अफ्रावत टेकड्यांवर अचानक हिमस्खलन झाले.
घटनेची माहिती मिळताच बचावाकर्य करणारे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी 19 परदेशी नागरिकांना वाचविले असून, या घटनेत दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती ANI ने दिली आहे.
(avalanche hit Jammu & Kashmir's Gulmarg two foreign nationals dead and 19 foreign nationals rescued)
दरम्यान, घटनास्थळी अद्याप बचावकार्य सुरू असून, अजून काहीजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.