Party Dainik Gomantak
देश

IPS अधिकाऱ्याचा पार्टीत राडा, व्यावसायिकाची पत्नी झाली जखमी

IPS अधिकाऱ्याने ग्लास फेकून मारला, आणि तो एका महिलेला लागला, तर ती जागीच जखमी झाली.

दैनिक गोमन्तक

दिल्लीत (Delhi) तैनात असलेल्या AGMUT कॅडरच्या एका IPS अधिकाऱ्यावर वाढदिवसाच्या पार्टीत गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे की, अधिकाऱ्याने ग्लास फेकून मारला, आणि तो एका महिलेला लागला, तर ती जागीच जखमी झाली. (The businessman wife was injured when an IPS officer stormed the party)

या घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नोएडा येथे राहणाऱ्या महिलेला एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. कैलास कॉलनीतील एका कॅफे आणि बारमध्ये एका रिअल इस्टेट व्यावसायिकाने त्याच्या वाढदिवसाची पार्टी (Party) आयोजित केली होती.

व्यावसायिकाची पत्नी जखमी

ही घटना पहाटे अडीचच्या सुमारास घडल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. पुढे म्हणाले की, जेव्हा अधिकारी गोंधळ घालू लागला तेव्हा त्याच्या काही मित्रांनी त्याला तिथे रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याने ग्लास फेकायला सुरुवात केली. यामध्ये त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या महिलेला तो ग्लास लागला. पोलिसांनी सांगितले की, महिला तिच्या पतीसोबत पार्टीला गेली होती, ती एक व्यावसायिक आहे.

खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

रात्री 2.57 च्या सुमारास महिलेच्या पतीने पोलीस नियंत्रण कक्षाला (PCR) शी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांना तीन टाके पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. मात्र, अद्याप महिलेच्या पतीची लेखी तक्रार पोलिसांना मिळालेली नाहीये. सूत्रांनी सांगितले की, दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांना या घटनेची माहिती देण्यात आली असून अंतर्गत चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Youth Protes: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

SCROLL FOR NEXT