भारताचे महान शास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस (Satyendra Nath Bose) यांना गुगलवर डूडल (Google Doodle) बनवून सन्मानित करण्यात आले आहे. सत्येंद्र नाथ बोस 1920 हे क्वांटम भौतिकशास्त्रावरील त्यांच्या संशोधनासाठी जगभरात ओळखले जातात. सत्येंद्र नाथ बोस यांच्या उंचीचा अंदाज तुम्ही यावरून लावूच शकता की महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइनने (Albert Einstein) देखील त्यांच्या क्वांटम सिद्धांताचे चाहते राहिले होते. असे असूनही सत्येंद्र नाथ बोस यांना भारतात हवा तसा सन्मान मिळू शकलेला नाहीये. त्यांनी लिहिलेले शोधनिबंधही देशातील कोणत्याही जर्नलमध्ये नाहीत. (Google created Doodle by Satyendra Nath Bose Einstein is also a fan of his theory)
बंगालमधून शिक्षण
महान भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस यांचा जन्म 1 जानेवारी 1894 रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ बोस हे ईस्ट इंडियन रेल्वे कंपनीच्या अभियांत्रिकी विभागामध्ये काम करत होते. सत्येंद्र नाथ बोस हे त्यांच्या 7 भावंडांपैकी सर्वात मोठे होते, तर त्यांचे सुरुवातीचे शिक्षण नादिया जिल्ह्यातील बडा जागुलिया गावात झाले आहे. पुढील शिक्षणासाठी ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गेले. यानंतर प्रेसिडेन्सी कॉलेजमधूनच 1995 मध्ये त्यांनी अप्लाइड मॅथ्समधून एमएस्सीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1996 मध्ये त्यांनी कोलकता विद्यापीठाच्या सायन्स कॉलेजमध्ये रिसर्च स्कॉलर म्हणून प्रवेश घेतला आणि थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीच्या अभ्यासाला सुरूवात केली.
बोस यांच्या नावावर अनेक शोध नोंदवले,
काही वर्षांपूर्वी हिग्ज बोसॉन म्हणजेच पार्टिकलचा शोध होता. या शोधानंतर सत्येंद्र नाथ बोस खूप चर्चेमध्ये आले होते. हिग्ज बोसॉनमध्ये हिग्ज हे नाव ब्रिटीश शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते, तर बोसॉनचे नाव भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस यांच्या नावावर ठेवले गेले होते. सत्येंद्र नाथ बोस हे भौतिकशास्त्रज्ञ तसेच पारंगत गणितज्ञ होते. बोस हे बोस-आईन्स्टाईन सांख्यिकी आणि बोस-आईनस्टाईन कंडेन्सेट सिद्धांतासाठी देखील ओळखले जातात. बोस यांचा शोध क्वांटम भौतिकशास्त्राला एक नवीन दिशा देत असतो.
गणितात 100 पैकी 110 गुण
सत्येंद्र नाथ बोस यांना इंटरमिजिएट गणिताच्या परीक्षेत 100 पैकी 110 गुण मिळाले होते. यावेळी बोस यांनी प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली आणि अनेक प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने सोडवली, आणि त्यानंतर त्याची प्रत तपासली असता त्यांना 100 पैकी 110 गुण मिळाले. त्याच वेळी, त्याने विक्रमी क्रमांकाने एमएसस उत्तीर्ण केली होती, तर हे आकडे अजूनही रेकॉर्ड मध्येच आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.