काश्मीरमध्ये परप्रांतीय बनले दहशतवाद्यांचे लक्ष्य, शोपियानमध्ये ग्रेनेड हल्ल्यात दोन मजूर जखमी

'आमचा जाव महत्वाचा' दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून स्थलांतर सुरू
Jammu-Kashmir
Jammu-KashmirDainik Gomantak
Published on
Updated on

काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगची प्रक्रिया थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मजुरांना आपले लक्ष्य बनवले आहे. शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी काही मजुरांवर ग्रेनेडने हल्ला केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये दोन मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही कामगार बाहेरील राज्यातील आहेत. गेल्या आठवडाभरापासून दहशतवादी सातत्याने अशा घटना घडवत आहेत. (Jammu Kashmir Target Killing)

यापूर्वी काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवाद्यांनी दोन मजुरांवर गोळ्या झाडल्या होत्या. ज्यामध्ये काही वेळातच एका मजुराचा मृत्यू झाला. दुसरा मजूर सध्या रुग्णालयात आहे. कामगारांवर झालेल्या या हल्ल्याच्या काही तासांपूर्वी दहशतवाद्यांनी कुलगाममधील बँकेत घुसून 26 वर्षीय व्यवस्थापक विजय कुमार यांची गोळ्या झाडून हत्या केली. जे राजस्थानमधील हनुमानगडचा रहिवासी होता.

Jammu-Kashmir
जम्मू-कश्मीरमध्ये परप्रांतीय मजुरांवर दहशतवाद्यांनी झाडली गोळी

जेव्हा दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये पुन्हा एकदा बाहेरच्या लोकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली, तेव्हा काश्मीरमधूनही पलायन सुरू झाले. स्थलांतरितांना काश्मीर सोडण्यास भाग पाडले जात आहे, ते म्हणतात की या क्षणी त्यांना त्यांच्या जीव महत्वाचा आहे. अशा वातावरणात आ्म्ही काम करू शकत नाही. या घटनांनंतर काश्मीरमधून मोठ्या प्रमाणात लोक निघताना दिसत आहेत. त्याचवेळी मोदी सरकारही या निर्गमनाच्या छायाचित्रांबाबत विरोधकांच्या निशाण्यावर आहे. भाजप केवळ काश्मीरच्या नावावर राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केल्याने खरे सत्य लोकांसमोर आले आहे.

Jammu-Kashmir
मान्सून ईशान्येकडे वळाला; दिल्लीसह 'या' राज्यांमध्ये उष्णतेची लाट

टार्गेट किलिंगबाबत केंद्राच्या सूचना

सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगबाबत केंद्र सरकारकडून काही सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. शुक्रवार, 3 जून रोजी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक झाली. ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख मनोज पांडे आणि जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्यासह सर्व अधिकारी सामील होते. या बैठकीत दहशतवाद पसरवणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या, तर काश्मिरी आणि बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या सर्व नागरिकांच्या सुरक्षेबाबतही चर्चा झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com