Jahangirpuri Violence Dainik Gomantak
देश

जहांगीरपुरी मिरवणुकीचा मुख्य आयोजक भाजप कार्यकर्ता

जहांगीरपूर हिंसाचार प्रकरणी (Jahangirpuri Violence) मिरवणूक काढल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एकाच कुटुंबातील 5 जणांना अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

जहांगीरपूर हिंसाचार प्रकरणी मिरवणूक काढल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एकाच कुटुंबातील 5 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुकेन सरकार, त्याचा भाऊ सुरेश सरकार, दोन मुले नीरज आणि सूरज याशिवाय सुकेनचा (Suken) शेजारी सुजित यांचा समावेश आहे. सुकेन सरकार हा मिरवणुकीचे मुख्य आयोजक होता आणि त्यानेच या यात्रेसाठी रथ तयार केला होता. (BJP activist Suken Sarkar the main organizer of the Jahangirpuri procession migrated to Delhi from Bengal 30 years ago)

मिरवणूक काढणाऱ्या या लोकांच्या कुटुंबीयांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया...

दिल्लीचे (Delhi) जहांगीरपुरी, जी-ब्लॉक, झुग्गी क्रमांक 16. याच पत्त्यावर 16 एप्रिलला संध्याकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीची सर्व तयारी करण्यात आली होती. 42 वर्षीय सुकेन सरकार हा मिरवणुकीचा मुख्य आयोजक होता. तो टाइल्स बनवणाऱ्या कंपनीत काम करतो. सुकेन, त्याची पत्नी आणि 3 मुले झोपडपट्टीत एका छोट्या खोलीत राहतात. सुकेनची पत्नी दुर्गा यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी सुकेनला 3 मुलांसह घेऊन गेले आहेत. यानंतर दुर्गा बिकट अवस्था आहे.

सुकेनने शोभा यात्रेचा रथ तयार केला होता

अरुंद रस्त्यावरुन जाताना सुकेनच्या घरी पोहोचल्यानतर मिरवणुकीचा रथ दिसला, ज्यावर दगडफेक झाली होती. सुकेनची पत्नी दुर्गा सांगते की, 'माझा नवरा गेल्या काही दिवसांपासून मिरवणुकीची तयारी करत होता आणि ज्या रथावर दगडफेक झाली तो रथही सुकेननेच तयार केला होता.'

तसेच, सुकेनच्या घराबाहेर एक पोस्टर लावण्यात आले आहे, ज्याबद्दल पत्नी दुर्गाने दावा केला की, सुकेन भाजपशी संबंधित आहे. या पोस्टरवर भाजपचे स्थानिक नेते केशवपुरमचे जिल्हाध्यक्ष राजकुमार भाटिया यांच्यासह सुकेन सरकारचाही फोटो असल्याचे दिसून आले आहे. राजकुमार भाटिया म्हणाले की, सुकेन हा विहिंप, बजरंग दल तसेच भाजपचा कार्यकर्ते आहे आणि माझ्यासाठी तो निवडणूक प्रचारातही सहभागी झाला होता.

सुकेनचे कुटुंब 30 वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथून दिल्लीत आले आणि जहांगीरपुरीमध्ये स्थायिक झाले. त्याच्या आजूबाजूला राहणारे लोकही बंगालचे हिंदू (Hindu) आहेत. बंगाली मुस्लिमही इतर गल्ल्यांमध्ये राहतात.

सुकेनची पत्नी दुर्गा सांगते की, ''अधूनमधून होणारे किरकोळ भांडण सोडले तर इथे कधीच एवढा मोठा गोंधळ झाला नाही. घरासमोर शिव आणि काली मंदिर आहे आणि आजूबाजूच्या अनेक घरांवर भगवे झेंडे आहेत. सुकेन हिंदू बंगाली समाज नावाची स्थानिक संस्था देखील चालवतात.''

पोलिस सिव्हिल ड्रेसमध्ये आले आणि सुकेन आणि मुलांना घेऊन गेले

सुकेणची पत्नी दुर्गा हिने सांगितले की, ''17 जानेवारीच्या रात्री काही पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये आले आणि त्यांनी सुकेनची चौकशी करुन सोडू असे सांगितले, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यापासून ते आजतागायत सोडलेले नाही. तीन-चार दिवसांपासून त्याची कोणतीही बातमी नाही. दगडफेकीत माझ्या मेहुण्या सुरेशचे डोके फुटले आहे. माझ्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना पोलिसांनी पकडले आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ना ढोल-ताशा, ना मंडप… थेट हॉस्पिटलच्या बेडवरच पठ्ठ्यानं केलं लग्न, व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, 'हा पक्का सरकारी नोकरीवाला असणार'

Goa Photo Contest: गोव्यातील नदी, डोंगर, निसर्गसौंदर्याचा फोटो काढा आणि 20 हजार रुपये जिंका; कसा घ्यायचा सहभाग, वाचा सविस्तर

Vice President Election Result: सी पी राधाकृष्णन बनले भारताचे 15वे उपराष्ट्रपती, एनडीएने जिंकली निवडणूक!

Balendra Shah: रॅपर ते लोकप्रिय राजकारणी... नेपाळच्या तरुणाईचा 'हिरो' आता पंतप्रधानपदाचा दावेदार, काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह चर्चेत

Sawantwadi Gambling Raid: सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर सावंतवाडीतील 4 मटका-जुगार अड्ड्यांवर धाड; 8 जणांवर कारवाई

SCROLL FOR NEXT