delhi jahangirpuri clash fresh stone pelting
delhi jahangirpuri clash fresh stone pelting DainikGomantakन

Delhi Violence : चौकशीसाठी गेलेल्या पोलिस पथकावर दगडफेक

आई म्हणाली - मुलाने रागात गोळीबार केला
Published on

जहांगीरपुरीमध्ये पुन्हा एकदा दगडफेकीची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलिसांना गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या पत्नीला न्यायचे होते तेव्हा लोकांनी तेथील पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. (delhi jahangirpuri clash fresh stone pelting)

यापूर्वी 16 एप्रिलला हनुमान जयंतीच्या दिवशी दिल्लीच्या (Delhi) जहांगीरपुरीमध्ये हिंसाचार झाला होता. या हिंसाचारानंतर आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या हिंसाचारात 8 पोलिसांसह 9 जण जखमी झाले आहेत.

मात्र, दगडफेक होऊनही पोलीस (police) पथकाने महिलेला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये शूटिंग करताना दिसणारा सोनू, त्याच्या पत्नीला पोलिसांनी पकडून चौकशीसाठी नेले आहे. आरोपी सोनू सध्या फरार असून, तो जहांगीरपुरीच्या सी ब्लॉकमध्ये राहतो.

delhi jahangirpuri clash fresh stone pelting
दिल्ली कॅपिटल्स संघ क्वारंटाइन, पुढील सामना 20 एप्रिलला?

आई म्हणाली - मुलाने रागात गोळीबार केला

त्याच्या आईने सांगितले की, त्या दिवशी जहांगीरपुरीमध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण झाले होते. यादरम्यान बजरंग दलाचे लोक आले असता मुलाने रागाच्या भरात गोळीबार केला. सोनू चिकन विकण्याचे काम करतो. सोनू सध्या फरार आहे. त्याचवेळी त्याचा भाऊ सलीम याला पोलिसांनी अटक केली आहे. संपूर्ण कुटुंब पश्चिम बंगालचे (West Bengal) आहे. आईने सांगितले की तिचा लहान मुलगा सलीम हिंसाचारात सहभागी नव्हता, तरीही त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी अटक केलेल्या 21 जणांमध्ये अस्लम आणि अन्सारचाही समावेश आहे. अस्लमवर गोळीबाराचाही आरोप आहे. याशिवाय पोलीस अन्सारला या घटनेचा मास्टर माईंड सांगत आहेत. पोलिसांनी दोन्ही मुख्य आरोपींना एक दिवसाची कोठडी दिली होती.

आतापर्यंत या लोकांना अटक करण्यात आली आहे

जहांगीरपुरी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सुरुवातीला जाहिद, अन्सार, शहजाद मुख्त्यार, मोहम्मद अली, आमेर, अक्षर, नूर आलम, अस्लम, झाकीर, अक्रम, इम्तियाज, मोहम्मद अली आणि अहिर यांच्यासह 14 आरोपींना अटक केली होती. संध्याकाळपर्यंत, दिल्ली पोलिसांनी आणखी चेहरे ओळखले ज्यात सूरज, नीरज, सुकेन, सुरेश, सुजित सरकार, जहांगीर पुरी जी ब्लॉकचे रहिवासी होते, त्यांनाही अटक करण्यात आली. याशिवाय दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com