Jahangirpuri Violence: हिंसाचारात सहभागी अन्सारसह पाच आरोपींवर NSA लागू

जहांगीरपुरी हिंसाचारात सहभागी असलेल्या 5 आरोपींवर दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू केला आहे.
Jahangirpuri Violence
Jahangirpuri ViolenceDainik Gomantak
Published on
Updated on

Jahangirpuri violence: जहांगीरपुरी हिंसाचारात सहभागी असलेल्या 5 आरोपींवर दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काल दिल्ली पोलिसांना दंगलखोरांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर आज 5 दंगलखोरांवर एनएसए लागू करण्यात आला आहे. अन्सार, सलीम, इमाम शेख उर्फ सोनू, दिलशाद आणि अहिर अशी एनएसएचा सामना करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

Jahangirpuri Violence
Delhi Jahangirpuri Violence: गोळीबार करताना अज्ञात व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, दिल्ली (Delhi) पोलिसांनी हिंसाचार प्रकरणातील आणखी एक आरोपी गुल्ली यालाही अटक केली आहे. हिंसाचारात सहभागी असलेल्यांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

पोलिसांच्या (Police) म्हणण्यानुसार, जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी अन्सार हा भंगार विक्रेता म्हणून काम करतो, परंतु त्याच्यावर सट्टासारखा अवैध धंदा चालवल्याबद्दल चार गुन्हेही दाखल आहेत. जहांगीरपुरी दंगलीत दोन नावे ठळकपणे समोर आली आहेत, एक अन्सार आणि दुसरे सोनू शेख उर्फ इमाम. 40 वर्षीय अन्सारवर 2009 मध्ये शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. 2011 ते 2019 या कालावधीत जुगार कायद्याचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. 2013 मध्ये विनयभंगाच्या कलम 509, मारहाणीचे कलम 323 आणि धमकावणे कलम 509 नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला होता. एक गुन्हा जुलै 2018 मधील कलम 186/353 आयपीसी ( Assault on a government employee and obstruction of government work) या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अन्सारने इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

Jahangirpuri Violence
Delhi Jahangirpuri Violence: गोळीबार करताना अज्ञात व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल

तसेच, जहांगीरपुरी सी ब्लॉकमधील रहिवासी असलेला अन्सार हे परिसरातील एक प्रसिद्ध नाव आहे, कारण त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड वाढल्याने, बेकायदेशीर पार्किंग, बेटिंग आणि ड्रग्जच्या व्यवसायात त्याची सक्रियता वाढत गेली. या सर्व कामातून तो दरमहा लाखोंची कमाई करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या भागातील अवैध धंद्यांच्या वसुलीचा काही भागही तो पोलिसांना देत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com