Mamata Banerjee ANI
देश

TMC Martyrs Day Rally: आज कोलकात्यात सर्वात मोठी रॅली, ममता बॅनर्जी करू शकतात अनेक मोठ्या घोषणा

21 जुलै 1993 रोजी कोलकाता येथे तृणमूलच्या 13 कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ज्यांच्या स्मरणार्थ शहीद दिन साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

TMC Martyrs Day Rally 2022: पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या शहीद दिन कार्यक्रमासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यानिमित्त टीएमसी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. दरवर्षी टीएमसी मोठ्या प्रमाणावर असे कार्यक्रम आयोजित करते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे या कार्यक्रमांचे आयोजन करता आले नाही. टीएमसीच्या या कार्यक्रमाला लाखो लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बंगालमधील शहीद दिनाच्या कार्यक्रमासाठी कोलकात्यात स्टेज सज्ज आहे. बंगालचे रस्ते पूर्णपणे टीएमसीच्या बॅनर आणि झेंड्यांनी भरलेले आहेत.

कोलकाता येथे पोहोचण्याचे आवाहन

शहीद दिन हा तृणमूल काँग्रेसचा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. या दिवशी, TMC सुप्रीमो ममता बॅनर्जी एका रॅलीद्वारे पक्षाचा रोडमॅप सादर करतात. ममता बॅनर्जी आपल्या राजकीय विरोधकांनाही व्यासपीठावरून कोणताही संदेश देऊ शकतात, असे मानले जात आहे. या रॅलीत ममता बॅनर्जी अनेक महत्त्वाच्या घोषणाही करू शकतात. टीएमसी नेत्यांवर विश्वास ठेवला तर या रॅलीत 10 लाखांहून अधिक लोक सहभागी होऊ शकतात. ज्याचे चित्र आज काही प्रमाणात दिसत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत: एक व्हिडिओ संदेश जारी करून शहीद दिनानिमित्त अधिकाधिक लोकांना कोलकाता येथे पोहोचण्याचे आवाहन केले आहे.

शहीद दिन का साजरा केला जातो?

21 जुलै 1993 रोजी कोलकाता येथे तृणमूलच्या 13 कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ज्यांच्या स्मरणार्थ शहीद दिन साजरा केला जातो. त्यावेळी ममता बॅनर्जी तृणमूल युवक काँग्रेसच्या नेत्या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन डाव्या सरकारच्या कथित निवडणूक अनियमिततेच्या विरोधात मोठे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि गोळीबारही केला. ज्यामध्ये तृणमूल युवक काँग्रेसच्या १३ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ममता बॅनर्जी दरवर्षी 21 जुलै हा शहीद दिन म्हणून साजरा करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT