'कामतापूर देशाची' मागणी करणाऱ्या दहशतवादी संघटनेने ममता बॅनर्जींना दिली धमकी

पश्चिम बंगाल पोलिसांनी सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या उत्तर बंगालमधील अलीपुरद्वार आणि जलपाईगुडी जिल्ह्यांच्या दौऱ्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeDainik Gomantak
Published on
Updated on

पश्चिम बंगाल पोलिसांनी सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उत्तर बंगालमधील अलीपुरद्वार आणि जलपाईगुडी जिल्ह्यांच्या दौऱ्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. राज्यात मुख्यमंत्र्यांना धमकावल्याचे प्रकरण समोर आले असून, त्यानंतर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी राज्याच्या उत्तरेकडील भागांच्या पूर्वनियोजित दौऱ्यावर जात आहेत. यापूर्वी प्रतिबंधित दहशतवादी संघटना कामतापूर लिबरेशन ऑर्गनायझेशनने (KLO) वेगळ्या राज्याच्या आंदोलनाला विरोध केल्यास 'रक्तपाताची' धमकी दिली आहे.

ममता बॅनर्जी तीन दिवसांत राजकीय आणि प्रशासकीय बैठका घेणार आहेत

एका कथित व्हिडिओमध्ये, KLO नेता जीवन सिंह असल्याचा दावा करणाऱ्या एका मुखवटा घातलेल्या व्यक्तीने ममतांना (Mamata Banerjee) उत्तर बंगालला भेट देण्याबाबत चेतावणी दिली. व्हिडिओमध्ये मुखवटा घातलेल्या व्यक्तीसोबत सशस्त्र अंगरक्षक दिसत आहेत. या व्हिडिओची सत्यता स्वतंत्रपणे पडताळून पाहता आलेली नाही. बॅनर्जी पुढील तीन दिवसांत अलीपुरद्वार आणि जलपाईगुडीमध्ये राजकीय आणि प्रशासकीय बैठका घेणार आहेत.

Mamata Banerjee
भाजप-काँग्रेसविरोधात एकजूट करण्याचा प्रयत्न; ममता बॅनर्जीं

कामतापूर राज्याच्या आमच्या मागणीला विरोध करु नका - दहशतवादी संघटना

राज्याच्या एका वरिष्ठ पोलिस (Police) अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “व्हिडिओमध्ये जीवन सिंग लष्करी गणवेशात आणि स्वयंचलित रायफल्सने सज्ज असलेला दिसत आहे. व्हिडिओ कुठे आणि केव्हा शूट करण्यात आला हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु सुरक्षा कडक करण्यात आली आहे. व्हिडिओनुसार, मुखवटा घातलेला माणूस म्हणाला, "आम्ही ममता बॅनर्जींसह सर्व लोकांना आवाहन करतो की, त्यांनी कामतापूर राज्याच्या आमच्या मागणीला विरोध करु नये. त्यांनी उत्तर बंगालमध्ये जाऊ नये. येत्या काही दिवसांत आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करु. त्यांच्याकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे.''

परिणाम विनाशकारी असतील -KLO

"आम्हाला कोणी रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम भयंकर होतील. रक्तपात होईल. यासाठी आम्ही आमच्या प्राणांची आहुती देण्यास तयार आहोत," असे व्हिडिओमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी व्हिडिओबद्दल भाष्य करण्यास नकार दिला परंतु ममता मंगळवारी अलीपुरद्वारमध्ये तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करणार असल्याने परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Mamata Banerjee
West Bengal: भाजप कार्यकर्त्याच्या आईच्या मृत्यूनंतर ममता बॅनर्जीं व अमित शहा यांच्यात खडाजंगी

कामतापूर लिबरेशन ऑर्गनायझेशन (KLO) ही दहशतवादी संघटना कोण आहे?

कामतापूर लिबरेशन ऑर्गनायझेशन ही ईशान्य भारतात स्थित एक अत्यंत डाव्या विचारसरणीची अतिरेकी संघटना आहे ज्याचा उद्देश 'कामतापूर' भारतातून (India) मुक्त करणे आहे. या दहशतवादी संघटनेच्या प्रस्तावित राज्यात पश्चिम बंगालमधील सहा जिल्हे आणि आसामच्या लगतच्या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com