Bengaluru Crime Dainik Gomantak
देश

दोन महिन्यांचं लिव्ह-इन रिलेशनशिप अन् 3 खून! बॉयफ्रेंडच्या मदतीनं तरुणीनं आई-वडिल अन् लहान बहिणीचा काढला काटा; बंगळुरु हादरलं

Bengaluru Triple Murder Case: बंगळुरुमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. येथील के. आर. पुरम परिसरातील सीगेहल्ली भागात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली.

Manish Jadhav

Bengaluru Triple Murder Case: बंगळुरुमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. येथील के. आर. पुरम परिसरातील सीगेहल्ली भागात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने आई-वडील आणि लहान बहिणीचा चाकूने भोसकून खून केला. या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली, तर दुसऱ्या मुख्य आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्वेता असे आरोपी मोठ्या मुलीचे नाव असून, ती गेल्या दोन महिन्यांपासून केनेथ नावाच्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत एका अपार्टमेंटमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र, श्वेताचे कुटुंब या आंतरजातीय किंवा अनैतिक नात्याच्या पूर्णपणे विरोधात होते. याच कारणावरुन श्वेता आणि तिच्या पालकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाद होत होते. सोमवारी संध्याकाळी श्वेताला समजवण्यासाठी तिचे वडील सोमसुंदर (52), आई मुथुलक्ष्मी (48) आणि तिची लहान बहीण सुप्रिया (19) हे तिघेही तिच्या सीगेहल्ली येथील फ्लॅटवर गेले होते.

तिथे गेल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यात लिव्ह-इन रिलेशनशिपच्या मुद्द्यावरुन जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात श्वेता आणि तिच्या बॉयफ्रेंडने मिळून घरातील धारदार चाकूने तिच्या आई, वडील आणि बहिणीवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर जखमांमुळे आणि अतिरक्तस्रावामुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच के. आर. पुरम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि ते पोस्टमार्टमसाठी ईस्ट पॉइंट रुग्णालयात पाठवून दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने आपल्याच कुटुंबाचा असा क्रूरपणे अंत केल्याने हे प्रकरण अत्यंत गंभीर बनले. या गुन्ह्यात सामील असलेल्या एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या असून, पोलीस फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीचा (Accused) कसून शोध घेत आहेत. प्रेमसंबंधांतील विकृतीमुळे एका सुशिक्षित कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बंगळुरुमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT