10 lakh aid RCB Dainik Gomantak
देश

Bengaluru Stampede: RCB चाहत्यांच्या मदतीला धावली!! मृतांच्या कुटुंबियांना करणार प्रत्येकी 10 लाखांची मदत

RCB fan death compensation: या घटनेमुळे आरसीबी कुटुंब अत्यंत व्यथित झाले असून त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली

Akshata Chhatre

IPL 2025 Stampede Compensation: आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष बंगळूरु शहरासाठी एक मोठी शोकांतिका ठरला. बुधवारी (४ जून) चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत ११ निष्पाप चाहत्यांचा बळी गेला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे आरसीबी कुटुंब अत्यंत व्यथित झाले असून गुरुवारी (५ जून) त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

'आरसीबी केअर्स' निधीतून जखमींना आधार

आरसीबी फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत म्हटले आहे, "बंगळूरुमध्ये काल घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे आरसीबीला खूप दुःख झाले आहे" आपल्या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे, "आदर आणि एकजुटीचा भाग म्हणून, आरसीबीने ११ मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याव्यतिरिक्त, या दुःखद घटनेत जखमी झालेल्या चाहत्यांना मदत करण्यासाठी 'आरसीबी केअर्स' नावाचा निधीही तयार करण्यात येत आहे."

बुधवारी आरसीबीच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आणि विराट कोहली व इतर खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहते स्टेडियमबाहेर जमले होते. प्रचंड गर्दीमुळे निर्माण झालेल्या गोंधळात ही भीषण चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे ११ जणांचा बळी गेला.

जखमींची प्रकृती स्थिर, बहुतेक रुग्णालयातून डिस्चार्ज

या घटनेतील जखमींपैकी बहुतेक जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही काही जखमींवर उपचार सुरू असले तरी, ते धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बंगळूरुच्या बोअरिंग अँड लेडी कर्झन रुग्णालयात एकूण १० रुग्ण दाखल करण्यात आले होते, त्यापैकी गुरुवारी केवळ दोघांवर उपचार सुरू होते, असे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले.

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीनंतर या रुग्णालयात एकूण १८ रुग्णांवर उपचार करण्यात आले होते, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक टी. केम्पराजू यांनी दिली. आरसीबीने घेतलेल्या या निर्णयामुळे दुःखितांना काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. या दुर्घटनेमुळे आरसीबीच्या पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT