
आयपीएल 2025 चा किताब किंग कोहलीच्या आरसीबीने जिंकला. त्यानंतर बुधवारी (4 जून) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) च्या खेळाडूंची व्हिक्ट्री परेड काढण्यात आली. या परेडला चाहत्यांनी मोठी गर्दी केली. यादरम्यान एक दुर्घटना घडली. व्हिक्ट्री परेडमध्ये चेंगराचेंगरी झाली. बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान, गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरसीबीच्या व्हिक्ट्री परेडमध्ये मोठ्या संख्येने चाहते चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर उपस्थित होते. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. परेड संध्याकाळी 5 वाजता सुरु होणार होती, परंतु ती होऊ शकली नाही. तत्पूर्वी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटण्यासाठी खेळाडू विधानसभेत पोहोचले असून त्यानंतर खेळाडूंची बस चिन्नास्वामी स्टेडियमकडे जाणार आहे.
आरसीबीचा (RCB) विजयोत्सव शोकात बदलला. गर्दीवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत. आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव केला. आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएलचे जेतेपद जिंकले. या विजयानंतर कर्नाटकसह देशातील अनेक शहरांमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला, परंतु आता संघाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीने या विजयाला धुसर केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.