Atique Ahmed Murder Case Dainik Gomantak
देश

Atique Ahmed Murder Case: अतिक अहमदला 'या' अत्याधुनिक पिस्तुलाने घातल्या गोळ्या, सिद्धू मुसेवाला कनेक्शन...!

Atique and Ashraf Ahmed Murder: माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची शनिवारी प्रयागराजमध्ये पोलिसांसमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

Manish Jadhav

Atique And Ashraf Ahmed Murder: माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची शनिवारी प्रयागराजमध्ये पोलिसांसमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

पोलिस दोघांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी कोल्विन रुग्णालयात पोहोचले असता अतिक आणि अश्रफ यांच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला.

यादरम्यान अतिक आणि अश्रफ हे माध्यमांशी बोलत असताना, माध्यमांच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला.

अतिक आणि अश्रफ यांच्यावर हल्लेखोरांनी ज्या पिस्तुलाने हल्ला केला ते अत्याधुनिक असून, हल्लेखोरांनी 15 हून अधिक राउंड फायर केल्याचं सांगण्यात येत आहे.

तुर्की बनावटीच्या पिस्तुलाने हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या

भारतात (India) बंदी असलेल्या अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांकडून अत्याधुनिक पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येमध्ये जिगाना मेड पिस्तूल वापरण्यात आले होते, जे तुर्कीमध्ये तयार होते.

जिगाना पिस्तूल हे सीमारेषेवरुन बेकायदेशीरपणे आणले जाते, ज्याची किंमत सुमारे 5 ते 6 लाख रुपये आहे आणि त्यात 17 गोळ्यांचे मॅगझिन आहे.

सिद्धू मुसेवाला याच्या हत्येतही याचा वापर करण्यात आला होता

अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांचे कनेक्शन पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्याशी जोडले गेले आहे.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येत तुर्की बनावटीच्या जिगाना पिस्तूलचाही वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या वर्षी 29 मे रोजी पंजाबमधील (Punjab) मानसा येथे सिद्धू मुसेवाला याची बदमाशांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

हल्लेखोरांकडे ही आधुनिक शस्त्रे कुठून आली?

अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून हल्लेखोरांकडे ही अत्याधुनिक हत्यारे कोठून आली याचाही शोध सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT