दुबई: रविवारी (१४ सप्टेंबर) झालेल्या आशिया कप २०२५ मधील भारत-पाकिस्तान सामन्यात अभिषेक शर्माने इतिहास रचला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध सात विकेटने भारी विजय मिळवला.
धोकादायक पिचवर १२८ धावांचे ध्येय गाठताना २५ वर्षीय अभिषेकने १३ बॉलमध्ये ३१ धावा करून संघाला सहजतेने पुढे नेले. या खेळात त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. विशेष म्हणजे, त्याने सामन्याच्या पहिल्या दोन बॉलमध्येच शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकार ठोकले.
अभिषेक शर्माने विराट कोहलीचा विक्रम मोडला. त्याने पाकिस्तानविरुद्ध टी२० सामन्यात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा मान मिळवला. पहिल्या सहा ओव्हर्समध्ये ३० पेक्षा जास्त धावा करणारा अभिषेक हा पहिला भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावानर होता, ज्याने २०२२ मध्ये हा विक्रम दुबईत नोंदवला होता.
अभिषेकचा हा पॉवरप्लेमधील स्कोअर तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिला व दुसरा क्रमांक पाकिस्तानच्या नासिर जमशेद (३४) आणि इमरान नाझीर (३३) यांचा आहे. आयूबच्या गोलंदाजीवर चौथ्या ओव्हरमध्ये अभिषेक आउट झाला.
भारताने २५ बॉल शिल्लक ठेवून हा सामना जिंकला, ज्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने ३७ बॉलमध्ये नाबाद ४७ धावा करून संघाला विजय मिळवून दिला.
फलंदाज | पॉवरप्लेमधील धावा | ठिकाण | वर्ष
अभिषेक शर्मा | ३१ | दुबई | २०२५ |
विराट कोहली | २९ | दुबई | २०२२
रोहित शर्मा| २८ | दुबई | २०२२
केएल राहुल| २८ | दुबई | २०२२ |
अजिंक्य रहाणे | २५ | अहमदाबाद | २०१२
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.