IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच पांड्यानं रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय VIDEO

Hardik Pandya Record: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 चा हाय-व्होल्टेज सामना सध्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरु आहे.
Hardik Pandya Record
Hardik PandyaDainik Gomantak
Published on
Updated on

Hardik Pandya Record: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 चा हाय-व्होल्टेज सामना सध्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याचा हा निर्णय चुकीचा ठरताना दिसत आहे. भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकाच्या पहिल्या लीगल बॉलवर विकेट घेत पाकिस्तानला मोठा धक्का दिला. या कामगिरीसह त्याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात हार्दिक पांड्या भारताकडून पहिले षटक टाकत होता. त्याच्या पहिल्या चेंडूवरच पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज सॅम अयुबने चुकीचा फटका मारला. पहिल्या चेंडूवर वाइडचा इशारा दिल्यानंतर पुढच्या चेंडूवर पांड्याने त्याला झेलबाद केले. जसप्रीत बुमराहने हा झेल घेतला आणि सॅम अयुब 'गोल्डन डक'वर बाद झाला. यासह, हार्दिक पांड्या कोणत्याही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्या लीगल बॉलवर विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला.

Hardik Pandya Record
IND vs PAK: भारतानं पाकिस्तानविरूध्दच्या मॅचवर बहिष्कार टाकला तर? गुणतालिकेत उलथापालथ निश्चित, पाकचा राहील वरचष्मा

याआधी अशी कामगिरी अर्शदीप सिंगने केली होती. त्याने टी-20 विश्वचषक 2024 मध्ये अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर शायन जहांगीरला बाद केले होते. हार्दिक पांड्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर घेतलेल्या विकेटने केवळ पाकिस्तानवरच नव्हे तर सामन्यावरही दबाव आणला आणि टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणले.

Hardik Pandya Record
IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

सॅम अयुबची निराशाजनक कामगिरी

पाकिस्तानचा सलामीवीर सॅम अयुबसाठी हा दुसरा सलग 'गोल्डन डक' आहे. याआधी, ओमानविरुद्धच्या सामन्यातही तो पहिल्याच चेंडूवर शून्य धावेवर बाद झाला होता. त्या सामन्यात शाह फैजलने त्याला एलबीडब्ल्यू (LBW) बाद केले होते. अशा महत्त्वाच्या सामन्यात सलग दोन सामन्यांमध्ये गोल्डन डक झाल्याने त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सॅम अयुबनंतर त्याचा साथीदार मोहम्मद हारिसही फारसा कमाल दाखवू शकला नाही. 5 चेंडूत 3 धावा करुन तो ही माघारी परतला, ज्यामुळे पाकिस्तानची सुरुवात आणखीनच खराब झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com