IND vs PAK: 'जलेबी बेबी'! पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं वेगळंच गाणं, दुबई स्टेडियममधील Video Viral

Jalebi Baby Song: जेव्हा दोन्ही संघ आपल्या राष्ट्रगीतासाठी मैदानावर आले, तेव्हा डीजेच्या एका चुकीमुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली.
Dubai International Stadium Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Dubai International Stadium Video: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 चा 'हाय-व्होल्टेज' सामना सध्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरु आहे. मात्र, सामन्यातील पहिल्या चेंडू आधीच पाकिस्तान संघाची चांगलीच नाचक्की झाली. नाणेफेकीदरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यांनी एकमेकांशी हस्तांदोलन (Handshake) करणे टाळले. पण यानंतर, जेव्हा दोन्ही संघ आपल्या राष्ट्रगीतासाठी मैदानावर आले, तेव्हा डीजेच्या एका चुकीमुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली.

नाणेफेकीवेळीच वाढला तणाव

भारत-पाकिस्तान सामन्यात नेहमीच तणावाचे वातावरण असते, आणि या सामन्यातही त्याची सुरुवात नाणेफेकीपासूनच झाली. जेव्हा दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी आले, तेव्हा त्यांनी एकमेकांकडे दुर्लक्ष केले. सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करणेही टाळले. या कृतीमुळेच सामन्यापूर्वीच दोन्ही देशांमधील तणाव स्पष्टपणे दिसून आला.

Dubai International Stadium Video
IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रगीतावेळी 'डीजे'ची चूक

नाणेफेकीनंतर दोन्ही संघ आपापल्या देशाच्या राष्ट्रगीतासाठी मैदानावर रांगेत उभे राहिले. पहिल्यांदा पाकिस्तानच्या राष्ट्रगीताची वेळ होती. पण स्टेडियममध्ये अचानक डीजेने 'जलेबी बेबी' (Jalebi Baby) हे गाणे वाजवले. हे गाणे गायक टेशर (Tesher) आणि जेसन डेरुलो (Jason Derulo) यांनी गायले आहे. गाणे सुरु झाल्यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्ये आणि मैदानावर उभे असलेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंमध्येही गोंधळ निर्माण झाला.

Dubai International Stadium Video
IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच पांड्यानं रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय VIDEO

हे गाणे साधारणपणे सहा सेकंदांपर्यंत वाजले आणि त्यानंतर तातडीने चूक लक्षात आल्यावर डीजेने पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजवले. पण तोपर्यंत पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगासह संपूर्ण संघ अवघडलेला आणि गोंधळलेला दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेवर मोठी चर्चा सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com