Night curfew

 
Dainik Gomantak
देश

कोरोना रुग्णसंख्येत वृद्धी झाल्याने कर्नाटक सरकारने घेतला 'हा' निर्णय

राज्यात 24 तासांत किमान 270 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली, असे राज्याच्या आरोग्य विभागाने शनिवारी आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

ओमिक्रॉनचा फैलाव वाढल्यामुळे कर्नाटक सरकारने रविवारी राज्यात नवीन निर्बंध लादले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार, सर्वत्र नाईट कर्फ्यू लावला जाईल, त्याचबरोबर मोठ्या मेळाव्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटकात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सध्या राज्यातील ओमिक्रॉन बंधितांची संख्या 38 वर पोहोचली आहे.

"28 डिसेंबरपासून, सुमारे 10 दिवस, आम्ही रात्री 10 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू (Night Curfew) (कलम 144) लागू केले आहे. राज्यात सार्वजनिक ठिकाणी मोठे मेळावे भरवण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर, भोजनालये, रेस्टॉरंट्स, पब येथे पूर्ण आसन क्षमतेच्या 50% क्षमताच वापरता येईल," असे डॉ के सुधाकर, कर्नाटकचे आरोग्य, कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी बेंगळुरू (Bangalore) येथे रविवारी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि कोविड -19 (COVID-19) वरील तांत्रिक सल्लागार समितीच्या (टीएसी) सदस्यांच्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लादले जाणार असल्याची घोषणा केली.

राज्यात 24 तासांत किमान 270 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली, असे राज्याच्या आरोग्य विभागाने शनिवारी आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. राज्यात आतापर्यंत मृतांचा आकडा 38,309 झाला आहे आणि मृत्यूचे प्रमाण 1.48% आहे. सुधाकर म्हणाले की, राज्य सरकार 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण (Vaccination) सुरू करणार आहे. राज्यात या वयोगटातील सुमारे 43 लाख व्यक्ती आहेत. राज्य सरकार 10 जानेवारीपासून आरोग्य सेवा कर्मचारी, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना बूस्टर डोस देणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT