Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मधील शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केले. यादरम्यान त्यांनी एका व्हिडिओबद्दल सांगितले. मन की बात कार्यक्रमातही हा व्हिडिओ चालवण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये काही परदेशी मुली आपल्या देशाचे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' गाताना दिसत होत्या.
ग्रीस मुली वंदे मातरम गाताना
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन विदेशी मुली भारताचे 'राष्ट्रीय गीत' (National anthem) गात आहेत. या मुली ग्रीसच्या असल्याचं पीएम मोदींनी सांगितलं. ग्रीसच्या (Greece) मुलींनी वंदे मातरमचे नेत्रदीपक सादरीकरण केले. पीएम मोदींनी या मुलींचे कौतुक केले आणि म्हटले की यावरून दोन्ही देशांमधील संबंध किती चांगले आहेत हे दिसून येते. याशिवाय, जगात भारताचा दबदबा किती वेगाने वाढत आहे हे पंतप्रधान मोदींनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील (pakistan) एका बलूच गायकाने भारताचे 'तेरी मिट्टी में मिल जावा' हे देशभक्तीपर गाणे गायले होते. बलुच गायक वहाब अली बुगाटीच्या आवाजातील हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
मन की बात कार्यक्रमात देशातील जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावेळी तुम्ही 2021 च्या निरोपाची आणि 2022 च्या स्वागताची तयारी करत असाल. नवीन वर्षात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था, येत्या वर्षात काहीतरी चांगले करण्याचा, संकल्प केला पाहिजे. गेल्या सात वर्षापासून आम्ही 'मन की बात' मधून चांगला व्यक्ती, समाज, देशाचे चांगुलपणा अधोरेखित करून चांगले काम करण्याची प्रेरणा देत आहोत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.