प्रधानमंत्री उदय योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

या अर्जामध्ये तुम्हाला मालमत्तेशी संबंधित सर्व माहिती भरावी लागेल. मालमत्ता कोणत्या जमिनीवर बांधली आहे आणि तिचे मालक कोण आहेत, इत्यादी माहिती द्यावी लागेल.
Apply to avail benefits of Pradhan Mantri Uday Yojana

Apply to avail benefits of Pradhan Mantri Uday Yojana

Dainik Gomantak

Published on
Updated on

दिल्लीच्या 1731 अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी चांगलं घर आणि चांगलं आयुष्य हे एक स्वप्न असते. लोकांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री उदय योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या घराची मालकी मिळू शकते. यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल.

कसा करणार अर्ज

सर्वप्रथम आपल्याला DDA च्या PM UDAY पोर्टलवर नोंदणी करावी लागेल

यासाठी मोबाइल किंवा कॉम्प्युटरवरून डीडीएच्या वेबसाइटवर जा आणि पीएम उदय वर क्लिक करा

नोंदणीसाठी तुम्ही PM UDAY मोबाईल अॅप देखील वापरू शकता

मोबाईल अॅपच्या मदतीने तुम्ही UC लोकेटर वापरू शकता. तुमची मालमत्ता अनधिकृत मालमत्तेच्या मर्यादेत आहे की नाही हे लोकेटर तुम्हाला सांगेल

<div class="paragraphs"><p>Apply to avail benefits of Pradhan Mantri Uday Yojana</p></div>
मुलांना कोणती लस दिली जाईल, नोंदणी कशी होईल? प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या

आता नोंदणी करण्यासाठी, नोंदणी पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला अर्जदाराचे तपशील, मालमत्तेचे तपशील आणि ईमेल इत्यादी भरावे लागतील. मोबाईल नंबर देऊन सबमिट वर क्लिक करा

सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला एक नोंदणी स्लिप मिळेल, त्याची प्रिंटआउट घ्या

स्लिपमध्ये जीआयएस कंपन्यांचा नोंदणी क्रमांक आणि तपशील असेल. भविष्यातील वापरासाठी त्यांची नोंद घ्या. यासह तुमची नोंदणी पूर्ण होणार.

आता तुम्हाला पीएम उदय मध्ये फॉर्म भरावा लागेल. याबाबतही माहिती देण्यात येत आहे. अर्ज भरण्यासाठी तुम्हाला चार टप्पे पार करावे लागतील. प्रथम, जीआयएस सर्वेक्षण करणे, दुसरे, कागदपत्रे गोळा करणे, तिसरे, अर्ज भरणे आणि चौथे, नोटरीचे आय बॉण्ड मिळवणे आणि हमीपत्र किंवा शपथपत्र तयार करणे.

यासाठी सर्व प्रथम जीआयएस सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी डीडीएने काही कंपन्यांची यादी केली आहे ज्यांचा नंबर तुमच्या नोंदणी स्लिपमध्ये नमूद केला आहे. या नंबरवर तुम्ही कोणत्याही कंपनीला कॉल करू शकता. तुम्ही निवडलेली एजन्सी तुमच्या मालमत्तेला भेट देईल आणि जिओ-कोऑर्डिनेट्स लागू करून डीडीए पोर्टलवर अपलोड करेल. यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीवर तुम्हाला एक अद्वितीय GIS आयडी पाठवला जाईल. नोंदणीच्या वेळी तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरद्वारे पीएम उदय पोर्टलवर लॉग इन करा. आता फाईल ऍप्लिकेशन लिंकवर जा आणि तुमच्या समोर एक अर्ज उघडेल.

<div class="paragraphs"><p>Apply to avail benefits of Pradhan Mantri Uday Yojana</p></div>
Mann Ki Baat: ग्रीस मुलींनी गायले 'वंदे मातरम'

या अर्जामध्ये तुम्हाला मालमत्तेशी संबंधित सर्व माहिती भरावी लागेल. मालमत्ता कोणत्या जमिनीवर बांधली आहे आणि तिचे मालक कोण आहेत, इत्यादी माहिती द्यावी लागेल. यानंतर काही कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.

दस्तऐवजांमध्ये, नवीन जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी किंवा विक्री करार, ज्याला सेल डीड देखील म्हणतात तो द्यावा लागेल. याशिवाय मृत्युपत्र, देयक पावती, ताबा कागदपत्रे, १ जानेवारी २०१५ पूर्वी केलेल्या बांधकामाचा कागदोपत्री पुरावा, मालकी किंवा इतर कोणताही पुरावा, मालमत्ता कर फेरफार कागदपत्रे (असल्यास), वीज बिल, शपथपत्र, हमीपत्र किंवा आय-बॉण्ड्स द्यावे लागेल.

ही सर्व माहिती दिल्यानंतर आणि कागदपत्रे सादर केल्यानंतर, अर्ज सबमिट करा. यामध्ये तुम्हाला तुमची स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी लागेल. शेवटी सबमिट केलेला अर्ज प्रिंट करा ज्यामध्ये तुम्हाला युनिक केस आयडी मिळेल. भविष्यात पुराव्यासाठी तुम्हाला हा आयडी उपयोगात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com