Firecracker Factory Blast Dainik Gomantak
देश

Firecracker Factory Blast: आंध्र प्रदेशात काळाचा घाला! फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 18 कामगारांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Andhra Pradesh Firecracker Factory Blast: आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली.

Manish Jadhav

Andhra Pradesh Firecracker Factory Blast: आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली. जिल्ह्यातील वेत्लापलेम गावातील एका फटाक्याच्या कारखाण्यात शनिवार, 28 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 18 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट इतका शक्तिशाली होता की, कारखान्याची इमारत जमीनदोस्त झाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले. मृतांमध्ये महिला कामगारांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) गृहमंत्री वंगालापुडी अनिता यांनी या घटनेची पुष्टी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काकीनाडा जिल्ह्यातील या फटाका युनिटमध्ये अचानक झालेल्या स्फोटात 18 जणांनी आपला जीव गमावला, तर सहा जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती गृहमंत्री अनिता यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी सगीली शान मोहन यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्यावर देखरेख ठेवत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हा स्फोट झाला, तेव्हा कारखान्यात सुमारे 20 हून अधिक कामगार काम करत होते. स्फोटानंतर लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण केल्याने बचावकार्यात सुरुवातीला अडथळे आले. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले.

त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत म्हटले की, "वेत्लापलेम येथील फटाका कारखान्यातील स्फोटाची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. मी तातडीने अधिकाऱ्यांशी बोललो असून मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत." मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी भेट देण्याचे आदेश दिले असून पीडित कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली जाईल, असेही आश्वासन दिले.

या दुर्घटनेनंतर फटाका कारखान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. हा कारखाना अधिकृत होता की अनधिकृत, तसेच तिथे सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात होते की नाही, याची चौकशी करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तैनात असून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की अनेक किलोमीटरपर्यंत तो ऐकू आला. या घटनेमुळे संपूर्ण आंध्र प्रदेशात शोककळा पसरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT