Telangana Chemical Factory Blast: तेलंगणात केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट, 10 जणांचा मृत्यू, 20 जखमी; कामगारांची स्थिती गंभीर

Chemical Plant Fire Incident: तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील एका केमिकल कारखान्यात सोमवारी (30 जून) मोठा स्फोट झाला. रिअ‍ॅक्टर स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला.
Chemical Plant Fire Incident:
Telangana Chemical Factory BlastDainik Gomantak
Published on
Updated on

Telangana Chemical Factory Blast: तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील एका केमिकल फॅक्टरीत सोमवारी (30 जून) मोठा स्फोट झाला. रिअ‍ॅक्टर स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे दोन डझन जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळावरुन सहा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी, काही कामगारांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेच्या व्हिडिओमध्ये फॅक्टरीतून बाहेर पडणारे कामगार गंभीरपणे भाजलेले दिसून येतात.

दरम्यान, सोमवारी तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील पासमैलारम फेज 1 परिसरातील एका रासायनिक फॅक्टरीत झालेल्या स्फोटात डझनहून अधिक कामगार जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अकरा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्फोटात औद्योगिक शेड पूर्णपणे उडून गेला.

Chemical Plant Fire Incident:
Telangana Political Crisis: BRS पक्षाचे आमदार, नेते गोव्यात तळ ठोकून का बसलेत? केटी रामाराव यांनी घेतली भेट

100 कामगार ड्युटीवर होते

दुसरीकडे, ज्या केमिकल फॅक्टरीत स्फोट झाला त्या केमिकल फॅक्टरीत विविध प्रकारची केमिकल्स बनवली जातात. घटनेच्या वेळी कारखान्यात सुमारे 100 कामगार काम करत होते. स्फोटात मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. तथापि, जखमी आणि मृतांची नेमकी संख्या अद्याप समोर आलेली नाही. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जखमी आणि मृतांची नेमकी संख्या बचाव कार्य संपल्यानंतरच कळेल. कंपनीच्या वेबसाइटनुसार, सिगाची इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक औषध कंपनी आहे.

Chemical Plant Fire Incident:
Telangana: YSR काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या रेव्ह पार्टीसाठी गोव्यातून मागवले अमली पदार्थ, मुख्य आरोपीला अटक

घटनास्थळी मृतदेह सापडला नाही

तेलंगणा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "ही घटना सिगाची फार्मा कंपनी, पसुमैलारम फेज 1 येथे घडली. अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सुमारे 15-20 लोक जखमी आहेत. सविस्तर माहितीची वाट पाहत आहोत." दरम्यान, प्रशासन बचाव कार्य करत आहे आणि त्यांना अद्याप घटनास्थळावरुन कोणताही मृतदेह मिळालेला नाही.

दुसरीकडे, संगारेड्डीचे पोलिस अधीक्षक परितोष पंकज यांनी सांगितले की, "आम्हाला अद्याप कोणताही मृतदेह मिळालेला नाही, बचाव कार्य सुरु आहे, आम्ही काही वेळात माहिती देऊ." अधिक माहितीची वाट पाहत आहे. तथापि, रुग्णालयात पोहोचल्यानंतर अनेक कामगारांना मृत घोषित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com