Chhattisgarh Factory Blast: छत्तीसगडमधील दारुगोळा कारखान्यात स्फोट, 10 हून अधिक जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले

Chhattisgarh Factory Blast: छत्तीसगडमधील बेमेतरा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील गनपावडर कारखान्यात मोठा स्फोट झाला.
Chhattisgarh Factory Blast
Chhattisgarh Factory BlastDainik Gomantak

Chhattisgarh Factory Blast: छत्तीसगडमधील बेमेतरा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील गनपावडर कारखान्यात मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात 10 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचीही बातमी समोर येत आहे. आजूबाजूच्या लोकांच्या गर्दीबरोबरच अग्निशमन आणि आरोग्य विभागाच्या पथकांसह पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. बेमेतरा येथील बेरला ब्लॉकच्या बोरसी गावात हा कारखाना सुरु होता.

अपघाताच्या वेळी 100 लोक काम करत होते

दरम्यान, अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे अनेकांना जीव गमवावा लागण्याची शक्यता आहे. कारखान्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या पथकाकडून ढिगारा हटवला जात आहे. अपघाताच्या वेळी कारखान्यात सुमारे 100 लोक काम करत होते.

Chhattisgarh Factory Blast
Chhattisgarh Accident: मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, पिकअपखाली चिरडून 18 मजुरांचा मृत्यू; 20 हून अधिक जखमी

SDRF चे 20 सदस्यीय बचाव पथक रवाना झाले

छत्तीसगडमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर एसडीआरएफचे 20 सदस्यीय बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. यासोबतच रायपूर येथून एक आणि दुर्ग येथून दोन अग्निशमन वाहनेही रवाना करण्यात आली आहेत. टीम पोहोचल्यानंतर ते आराखडा तयार करतील आणि बचावकार्य सुरु करतील.

जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले, म्हणाले- तपास सुरु आहे

या प्रकरणाची माहिती देताना बेमेतराचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा म्हणाले की, एसडीआरएफची टीम येताच ढिगारा हटवण्याचे काम तातडीने सुरु केले जाईल. ही घटना कोणत्या कारणामुळे घडली हे आता सांगणे कठीण आहे. कारण तो गनपावडरचा कारखाना होता, रसायनेही होती. पण असे का झाले हे सांगणे थोडे कठीण आहे. मी कारखान्याच्या संचालकांशी बोलत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com