Crime News Dainik Gomantak
देश

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Ahmedabad Crime News: अहमदाबादच्या सरखेज भागात 12वीत शिकणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अत्यंत धक्कादायक खुलासा करत एका महिलेला अटक केली.

Manish Jadhav

Ahmedabad Crime News: अहमदाबादच्या सरखेज भागात 12वीत शिकणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अत्यंत धक्कादायक खुलासा करत एका महिलेला अटक केली. स्वतःच्या मुलाच्या अल्पवयीन प्रेयसीला "जर तू माझ्या मुलावर खरे प्रेम करत असशील, तर गळफास घेऊन आत्महत्या कर" असे सांगत तिला मानसिक त्रास देऊन आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप या महिलेवर सिद्ध झाला. 31 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडवून दिली असून पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिला गजाआड केले.

मृत मुलगी आणि आरोपी महिलेचा मुलगा हे दोघेही वर्गमित्र होते आणि गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. सुमारे तीन-चार महिन्यांपूर्वी मुलीच्या पालकांना या प्रेमाबद्दल समजल्यानंतर, दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने त्यांनी मुलाच्या घरी जाऊन त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, दोन्ही अल्पवयीन प्रेमी एकमेकांच्या संपर्कात राहिले. नुकतेच शाळेच्या मैदानावर हे दोघे एकत्र बसलेले असताना मुख्याध्यापकांनी दोन्ही पालकांना शाळेत बोलावून समज दिली होती. या प्रकारामुळे मुलाची आई अत्यंत संतप्त झाली आणि तिने थेट मुलीचे घर गाठले.

मुलीच्या घरी जाऊन या महिलेने सुमारे अर्धा तास त्या 17 वर्षीय मुलीला (Girl) प्रचंड मानसिक त्रास दिला आणि अपमानित केले. मुलीच्या वडिलांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, आरोपी महिलेने मुलीला धमकावत सांगितले की, जर तुझे माझ्या मुलावर खरे प्रेम असेल तर घरात कोणी नसताना फाशी घे, तुझ्या पालकांचे काय करायचे ते मी बघून घेईन. या अत्यंत धक्कादायक संभाषणामुळे अल्पवयीन मुलगी प्रचंड मानसिक तणावाखाली गेली आणि तिने 31 ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

घटनेनंतर मुलीच्या पालकांनी पोलिसांत धाव घेत आरोपी महिला आणि मुलीच्या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग तसेच महिला घरी आल्याचे सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून सादर केले. पोलिसांनी डिजिटल पुराव्यांची सखोल चौकशी करुन आणि ऑडिओ क्लिपची पडताळणी केल्यानंतर आरोपी महिलेवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. पुरावे स्पष्ट झाल्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करुन तिची रवानगी तुरुंगात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT