Ahmedabad Air India Plane Crash Dainik Gomantak
देश

Ahmedabad Flight: अपघात झालेले विमान उतरणार होते 'मोपा'वर! लंडनहून येणार होते गोव्याला; अहमदाबाद दुर्घटनेनंतर वेळापत्रकात बदल

London to Goa Mopa Airport: ही बाब लक्षात घेता लंडनहून गोव्यात येणाऱ्या विमानात आप्तस्वकीय प्रवास करणार असल्याने अनेक गोमंतकीय कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sameer Panditrao

पणजी: अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात आज राज्यात विशेष चर्चेचा ठरला. कारण अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघातग्रस्त ठरलेले विमान मूळतः दुसऱ्या दिवशी (ता. १३) लंडनहून गोव्याकडे (गॅटविक ते मोपा) येणार होते. मात्र, या दुर्घटनेमुळे आता लंडनवरून गोव्यासाठीच्या विमानाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून प्रवासाचा कालावधीही लांबवण्यात आला आहे.

ही बाब लक्षात घेता लंडनहून गोव्यात येणाऱ्या विमानात आप्तस्वकीय प्रवास करणार असल्याने अनेक गोमंतकीय कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी साशंकता व्यक्त होत आहे.

दरम्यान, विमानतळ प्रशासन आणि एअरलाईन कंपनीकडून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तपासण्या पूर्ण केल्याचे सांगण्यात येत असून लवकरच विमान नियोजित मार्गावर उड्डाण करेल, असा दावा केला जात आहे. तरीदेखील अपघाताच्या छायेखाली आलेले हे उड्डाण आणि प्रवासाशी संबंधित असलेल्या कुटुंबांमध्ये अद्यापही अस्वस्थता आहे.

मुख्यमंत्र्यांकडून शोकसंवेदना

अहमदाबादमध्ये लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाला आज झालेल्या अपघातानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. विमान अपघाताची दुःखद बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे. या कठीण वेळी विमानातील सर्व प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या सदिच्छा आणि प्रार्थना आहेत, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT